Coronavirus (Photo Credit: Twitter)

भारतात कोरोना संक्रमितांची COVID-19 Positive) संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात या संख्येने अक्षरश: कळस गाठला आहे. 11,929 नव्या रुग्णांसह देशात (India) कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,20,922 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 311 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांची एकूण संख्या 9195 वर पोहोचली आहे. सद्य स्थितीत देशात 1,49,348 रुग्णांवर उपचार सुरु असून 1,62,379 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते बरे होऊन घरी परतले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रलायाने (Health Ministry of India) दिली आहे.

देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात असून सद्य घडीला राज्यात एकूण 1,04,568 रुग्ण आढळले आहेत. सर्दी, खोकला, कफ, स्नायू दुखी, घसा खवखवणे, नाक गळणे, अतिसार ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते. मात्र आता यात बेचव होणे आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे या दोन लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली असून त्यानुसार लोकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Coronavirus: बेचव आणि वास न येणे ही देखील COVID-19 ची लक्षणे, आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

तोंडाची चव जाणे आणि वास घेण्यास अडथळा निर्माण होणे हे देखील कोरोनाची लक्षणे असल्याचे वैद्यकिय तपासात आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

या सर्वावर चर्चा करण्यासाठी येत्या 28 जूनला नरेंद्र मोदी 'मन की बात' च्या 66 व्या एपिसोडच्या माध्यमातून जनतेच्या समोर येणार आहेत. हा रेडिओ कार्यक्रम पहिल्यांचा 3 ऑक्टोंबर 2014 मध्ये सुरु करण्यात आला होता.