भारतात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत जाणे यास मुख्य कारण अनेकदा या विषाणूचे निदान लवकर न होणे हे आहे. लोकांना सर्दी, खोकला, ताप आल्यास तो वायरल आहे असे समजून ते त्याकडे दुर्लक्ष करतात. ज्याचा परिणाम लोकांना कोरोनाची लागण होत आहे. सर्दी, खोकला, कफ, स्नायू दुखी, घसा खवखवणे, नाक गळणे, अतिसार ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते. मात्र आता यात बेचव होणे आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे या दोन लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली असून त्यानुसार लोकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तोंडाची चव जाणे आणि वास घेण्यास अडथळा निर्माण होणे हे देखील कोरोनाची लक्षणे असल्याचे वैद्यकिय तपासात आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. How to Wear Mask: वैद्यकिय मास्क घालताना काय काळजी घ्याल?
Loss of smell (anosmia) or loss of taste (ageusia) added to the list of #COVID19 symptoms by the Health Ministry. pic.twitter.com/PM6ZkEkHK4
— ANI (@ANI) June 13, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार एका दिवसात कोरोनाचे 11,458 नवे रुग्ण आढळून आले आहेत, यानुसार देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 8 हजार 993 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 45 हजार 779 ऍक्टिव्ह प्रकरणे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याशिवाय, 1 लाख 54 हजार 330 जणांनी कोरोनावर मात केली आहे तसेच 8884 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा जरी 3 लाखाच्या वर गेला असला तरी सद्य घडीला ऍक्टिव्ह आणि बरे झालेल्या रुग्णांच्या आकड्यानुसार कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे ही काहीशी दिलासादायक बाब म्हणता येईल.