कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रार्दुभाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क (Mask) घालणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. मात्र अनेकांना हा मास्क कशा पद्धतीने हाताळावा याबद्दल याचीच नीट माहिती नाही. मास्क योग्य रित्या न हाताळल्यास तुमच्या शरीरात कोरोनाचे विषाणू फैलाव करण्याची शक्यता आहे. मास्क नीटरित्या हाताळण्यासाठी तुमचे हात नेहमी स्वच्छ असले पाहिजे. केंद्र सरकारच्या #IndiaFightsCorona या ट्विटर पेजवर मास्क कसा हाताळावा याबाबत एका पोस्टरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
वैद्यकिय मास्क (निळ्या रंगाचा) हा साधारण वापरून फेकून द्यायचा असतो. फक्त हा मास्क कसा घालावा, त्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत काही महत्त्वाच्या स्टेप्स दिल्या आहेत.
हेदेखील वाचा- COVID-19 वर मात करण्यासाठी शिवणयंत्राशिवाय कपड्याचा वापर करुन घरच्या घरी मास्क कसा बनवाल? पाहा सोप्या ट्रिक्स
📍How to wear a medical mask safely❓❓❓#StaySafe
Via @WHO pic.twitter.com/RFBFd9sDhO
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) June 12, 2020
1. मास्क घालण्याच्या आधी हात स्वच्छ साबणाने धुवून घ्यावे.
2. मास्क कुठे फाटला नाही ना ते निरखून पाहावे.
3. वरची बाजू पाहून दोन मास्कला असलेल्या रबरबँड दोन हातात पकडावे.
4. मास्कला मध्ये कुठे हात न लावता बाजूला मास्क कानावरून किंवा डोक्यातून घालावा.
5. मेटल बाजू वर जाडसर बाजू नाकावर येते की नाही ते पाहावे.
6. आपले तोंड, नाक, हनुवटी पूर्णपणे झाकली गेली आहे की नाही तपासावे.
7. मास्क वापरुन झाल्यास तो काढून त्वरित कच-याच्या डब्ब्यात फेकावा.
8. नंतर हात पुन्हा स्वच्छ धुऊन घ्यावे.
तुमचा मास्क घरात कुठेही इतरत्र ठेवू नका. जेणेकरुन घरातील लहान मुलांच्या हाती लागण्याची शक्यता जास्त असते. योग्य ती काळजी घ्यावी. वापरलेला मास्क इतर कोणाच्याही हातात लागल्यामुळे संबंधित व्यक्तीस विषाणू पसरू शकतात.