COVID-19 वर मात करण्यासाठी शिवणयंत्राशिवाय कपड्याचा वापर करुन घरच्या घरी मास्क कसा बनवाल? पाहा सोप्या ट्रिक्स
Surgical Mask (Photo Credits: Getty Images|Representational Image)

कोरोना व्हायरसचे राज्यात वाढत जाणारा प्रसार लक्षात घेता आता मुंबई, पुणे महानगर प्रदेशात मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. त्यात लॉकडाऊन असताना लोकही अगदी सर्रासपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यामुळे आता मुंबई, पुण्यात मास्क (Mask) अनिवार्य केले आहे. मास्कचा वाढती मागणी पाहता अनेक ठिकाणी मास्कचा काळाबाजर उघडकीस येत आहे. यामुळे मास्कचा तुटवडा निर्माण झाल्याने मास्क बनवायचा कसा असा प्रश्न अनेकांना पडला असेल.यात ज्यांच्या घरी शिवणयंत्र नसेल त्यांच्यासाठी हा मास्क बनवायचा कसा असा मोठा प्रश्न जनतेसमोर असेल.

देशात अनेक मेडिकल मध्ये N-95 मास्क मिळत आहे. मात्र मागणी जास्त असल्यामुळे तेथेही मास्कचा तुटवडा निर्माण होत आहे. अशा वेळी घरच्या घरी शिवणयंत्राशिवाय देखील आपण साध्या कपड्याच्या साहाय्याने मास्क बनवू शकतो. तर अशा पद्धतीचे मास्क तुम्हाला घरच्या घरी देखील बनवता येईल. Coronavirus: बाजारात 'मास्क' उपलब्ध नसतील तर 'या' सोप्या पद्धतीने बनवा 'घरगुती मास्क': पहा व्हिडिओ

पाहा व्हिडिओ:

सर्वात महत्त्वाचे नुसते मास्क बनवणे हे महत्त्वाचे नसून हे कपड्यांचे मास्क रोजच्या रोज धुणे आणि सॅनिटाईज करणे देखील गरजेचे आहे. घराबाहेर जाणे टाळा आणि लोकांशी बोलताना सुरक्षित अंतर ठेवा.