Coronavirus: बाजारात 'मास्क' उपलब्ध नसतील तर 'या' सोप्या पद्धतीने बनवा 'घरगुती मास्क': पहा व्हिडिओ
घरगुती मास्क (PC- Instagram)

How To Make Face Mask At Home: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात आतापर्यंत 6 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. देशात 100 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून या आजारामुळे आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरला आहे.

दरम्यान, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून नागरिकांना मास्क वापरण्यासंदर्भात काही सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांनी प्रत्येक नागरिकाला मास्क वापरायची गरज नसल्याचं म्हटलं आहे. परंतु, जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप असेल. किंवा तुम्ही कोरोनाग्रस्त तसचं रुग्णालयातील कर्मचारी असाल तर मास्क लावा, असं सांगण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात भीतीमय वातावरण तयार झालं आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी लोक आपली काळजी घेत आहेत. सध्या  मास्कचे (Mask) दर गगनाला भीडले आहेत. त्यामुळे सर्वासामान्य जनतेला मास्क घेणं परवडणारं नाही. परंतु, आम्ही आज या लेखातून तुम्हाला घरगुती मास्क (Homemade Mask) कसा बनवायचा याबद्दल माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणताही खर्च लागणार नाही.

केवळ एका स्वच्छ रुमालाच्या साहाय्याने तुम्ही हा मास्क बनवू शकता. यासाठी तुम्हाला दोन रबरची गरज भासणार आहे. स्वच्छ धुतलेला रुमालाची एकावर-एक अशा पद्धतीने समांतर घडी घाला. त्यानंतर या रुमालाच्या घडीमध्ये रबर घाला. त्यानंतर रुमालाच्या दोन्ही बाजू दुमडून घ्या. त्यानंतर दोन्ही बाजूचे रबर कानाला लावा. अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने रुमालाच्या साहाय्याने घरगुती मास्क बनवू शकता. (हेही वाचा - Coronavirus Outbreak In Maharashtra: महाराष्ट्रात मेडिकल स्टोअर्स, रेल्वे, बस सेवा ते मॉल, मंदिरं नेमकं काय राहणार सुरू आणि बंद? घ्या जाणून)

सध्या सोशल मीडियावर घरगुती मास्क कसा बनवायचा यासंदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अब्दुल कबीर शेख या युझर्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका लहान मुलाचा मास्क बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहुन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मास्क बनवू शकता.

 

View this post on Instagram

 

How to make face mask at home, Can be substitute to expensive mask #corona #coronavirus #facemask

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh) on

घरगुती मास्क वापरण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण घरगुती मास्क वापरणं हा तात्पुरता पर्याय आहे. बाजारात मास्क उपलब्ध नसेल तरचं हा पर्याय निवडा. आज राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 39 वर पोहचला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्र राज्यात असल्याने आता त्याला रोखण्यासाठी वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.