Covid-19 Vaccine Dry Run | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये सीरम आणि भारत बायोटेकच्या प्रत्येकी एका लसीला मान्यता मिळाल्यानंतर आता देशवासियांसाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यासाठी प्रशासनाची रंगीत तालीम सुरू आहे. भारतामध्ये आज दुसरे ड्राय रन पार पडणार आहे. या ड्राय रन मध्ये 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 736 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या ड्राय रनच्या माध्यमातून ऐन लसीकरणाच्या वेळेस गोंधळ होऊ नये म्हणून विशेष काळजी यंत्रणांची तयारी करून घेतली जात आहे. 2 जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर मध्ये झालेल्या ड्राय रन नंतर आता आज (8 जानेवारी) मुंबई मध्ये ड्राय रन पार पडणार आहे. Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?

महाराष्ट्राचा विचार करता या दुसर्‍या ड्राय रन मध्ये राज्यातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यांत 3 आरोग्य संस्था आणि प्रत्येक महानगरपालिकेत 1 आरोग्य संस्था अशा ठिकाणी कोरोना लसीकरणाबाबतची ड्राय रन पार पडेल. मुंबई मध्ये बीकेसी परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड 19 सेंटर मध्येही ही ड्राय  रन पार पडणार आहे.   केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून Fake CoWIN App बाबत अलर्ट जारी; फसव्या अ‍ॅपच्या जाळ्यात न अडकण्याचं आवाहन.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन देखील आज दुसर्‍या ड्राय रनचा आढावा घेण्यासाठी चैन्नईमध्ये दाखल झाले आहेत. ते स्वतः काही ठिकाणी भेट देण्याची शक्यता आहे. कोविड 19 चे लसीकरण मोहिमेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोविन सिस्टम बनवण्यात आली आहे. ड्राय रन दरम्यान त्यामध्येही माहिती नीट अपडेट होतेय की नाही? याची खातरजमा केली जाणार आहे.

भारतामध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 1 कोटी 3 लाख च्या पार गेला आहे. यापैकी 1 कोटी 16 हजार रूग्णांनी या आजारावर मात देखील केली आहे. दरम्यान देशाचा रिकवरी रेट 95% पेक्षा अधिक आणि जगात सर्वाधिक आहे. पण पुन्हा जनजीवन सुरळीत करण्यासाठी आणि Coronavirus Pandemic च्या विळख्यातून बाहेर येण्यासाठी आता लसीकरण आवश्यक बनले आहे.