पुणे जिल्ह्यात आज 369 कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 7012 वर; 28 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
May 28, 2020 11:35 PM IST
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्याचा रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार विभागणी करण्यात आली असून कोरोनाची परिस्थिती पाहून काही क्षेत्रात लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहे. तर येत्या 31 मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा संपणार आहे. त्यामुळे 31 मे नंतर लॉकडाउन पुढे वाढणार की नाही या बाबतच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्र सरकाराच्या हाताबाहेर गेल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी विरोधक वारंवार राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेत आहेत. मंगळवारी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.
राज्यात शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक तसेच अन्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच शिक्षण विभागाने शाळेत हात धुण्यासाठी जंतूनाशक व स्वच्छतेच्या तर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
अमेरिकेत ही कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तेथे कोरोनाच्या रुग्णांसह बळींचा आकडा आता 1 लाखांच्या पार गेला आहे. हा आकडा जगातील सर्वाधिक जणांचा बळी गेल्याचा असल्याचे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी म्हटले आहे. तर याबाबत एफपी न्यूज ऐजंसी यांनी बातमी दिली आहे.