Coronavirus Update: देशात कोरोनारुग्ण संख्या 14 लाखाच्या पार, 24 तासात 49,931 रुग्णांची विक्रमी वाढ, पहा आकडेवारी
Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In India: देशातील कोरोनाबाधितांची 27 जुलै ची आकडेवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यानुसार, मागील 24 तासात कोरोनाचे तब्बल 49,931 नवे रुग्ण देशभरात आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 14 लाख 35 हजार 453 वर पोहचली आहे. यातील 4,85,114 ऍक्टिव्ह रुग्ण (COVID19 Active Cases)  आहेत तर, 9,17,568 रुग्णांनी आजवर कोरोनावर मात करून डिस्चार्ज घेतला आहे. मागील 24 तासात देशात कोरोनामुळे तब्बल 708 जणांना प्राण गमवावे (Coronavirus Deaths) लागले असून सध्या देशातील कोरोना मृतांची संख्या 32,771 वर पोहचली आहे. यामध्ये एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि ऍक्टिव्ह रुग्ण यांच्यातील फरक पहिल्यास देशातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट दिसून येतेय. भारतात COVID19 चा रिकव्हरी रेट 63.92 टक्क्यांवर पोहचला

दुसरीकडे देशात कोरोना चाचण्या वेगाने घेतल्या जात आहेत, आजवर COVID19 च्या एकूण 1,68,06,803 चाचण्या विविध सरकारी आणि खाजगी लॅब मध्य पार पडल्या. यातील 5,15,472 चाचण्या तर अवघ्या 24 तासात पार पडल्या आहेत.

ANI ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबई, दिल्ली, कोलकाता येथे High-Throughput COVID-19 Testing Facilities केंद्रांचे उद्घाटन करणार आहेत. या केंद्रातून दिवसाला कमीत कमी १० हजार चाचण्या घेण्याची क्षमता असेल. तसेच कोरोना संकटाच्या नंतर अन्यही चाचण्या घेण्यासाठी या केंद्रांचा वापर करता येईल.