Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत याच्या स्वयंपाक्यांनी सोडले DRDO; 26 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Siddhi Shinde | Aug 26, 2020 11:35 PM IST
A+
A-
26 Aug, 23:34 (IST)

सुशांत सिंह राजपूत याच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करणारे त्याचे मित्र सिद्धार्थ पिठानी आणि नीरज सिंग यांनी DRDO गेस्ट हाऊस सोडले आहे. सीबीआय सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करत आहे.

26 Aug, 23:05 (IST)

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मला वाटते की या संपूर्ण प्रकरणात काहीतरी भयंकर आहे आणि या प्रकरणात काही मोठ्या लोकांचा सहभाग असल्याचे दिसून येते. सर्वात आधी मुंबई पोलिस आयुक्त आणि त्या भागातील डीसीपी यांचे निलंबन करण्यात यावे.

26 Aug, 22:49 (IST)

भारतीय जनता पक्षाने सय्यद जफर इस्लाम यांना उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडले.

26 Aug, 22:33 (IST)

कोरोना व्हायरस दरम्यान नीट, जेईई परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी, 28 ऑगस्टला देशभरात निषेध नोंदविण्याची घोषणा कॉंग्रेसने केली आहे.

26 Aug, 22:12 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 1,617 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 87,317 झाली आहे. तर 1,369 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 14,940 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 4,20, 058 झाली असून, आज 6,164 टेस्ट घेण्यात आल्या.

26 Aug, 21:48 (IST)

वस्तू सेवा कर परिषद अर्थातच जीएसटी परिषदेची एक बैठक उद्या पार पडत आहे. ही 41 वी बैठक आहे. या बैठकीत केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या जीएसटी परताव्याबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.

26 Aug, 21:26 (IST)

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी गराडा घातला. फी माफीच्या मुद्द्यावरुन हे कार्यकर्ते आक्रमक होते. दरम्यान पोलिसांनी या कार्यकर्त्यांना मारहाम केल्याचे वृत्त आहे. अब्दुल सत्तार यांनी संबंधित कार्यकर्ते विनामास्क होते. तसेच, पोलिसांनी त्यांच्यावर काही बेकायदेशीर कारवाई केली असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे सत्तार यांनी म्हटले आहे.

26 Aug, 20:56 (IST)

मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई शहरात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 1,854 रुग्णांची नोंद झाली. तर 776 जणांना डिस्चार्ज देण्यात आली. मुंबईत आज दिवसभरात 28 जणांचा कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.

26 Aug, 20:51 (IST)

राज्यात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 14,888 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 295 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित एकूण रुग्णांची संख्या आता 7,18,711 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या 5,22,427 आणि रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 1,72,873 जाणांचाही समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

26 Aug, 20:13 (IST)

महाड येथील पाच मजली इमारत कोसळल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार व पाच वर्षांच्या दोन लहान मुलांचे पालकत्व नगरविकासमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे. मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन लहानग्यांची नावे आहेत.

Load More

रायगडमधील महाड (Mahad) ची तारिक गार्डन इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आता 15 पर्यंत पोहचला आहे. एनडीआरएफ सह बचावकार्यात रुजु संघटनांकडून 7 पुरूष आणि 8 महिलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही एका व्यक्तीचा शोध लागणं बाकी असल्याने बचावकार्य सुरू आहे.तारीक गार्डन ही इमारत 24 ऑगस्टच्या संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास कोसळली. त्यानंतर तात्काळ बचत कार्याला सुरूवात झाली आहे.

दुसरीकडे आज केंद्र सरकार कडुन जेईई आणि नीट परिक्षेसाठी राज्यनिहाय परिक्षा केंद्राची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशभरातुन होणार्‍या विरोधानंंतरही केंद्र सरकार ठरलेल्या वेळेत सप्टेंबर मध्ये या परिक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान,आज महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरी पुजनाचा उत्साह पाहायला मिळतोय, कालच्या दिवशी गौरीचे घरोघरी आगमन झाले असुन आज त्यांची पुजा व उद्या पाच दिवसांच्या गणपती सह विसर्जन केले जाणार आहे.


Show Full Article Share Now