प्रमुख शहरांमधील घर विक्री ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 मध्ये चतुर्थांश-तिमाही आधारावर 50 टक्क्यांनी वाढली; 25 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Jan 25, 2021 11:25 PM IST
केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्ली येथे जमले आहेत. यात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा मोठा समावेश आहे. दरम्यान, देशभरातील राज्यांच्या राजभवनांवरही शेतकरी प्रादेशिक पातळीवर मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्रातही या मोर्चाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नाशिक आणि राज्याच्या इतर भागांतून आलेले शेतकरी आणि कामगार मुंबई येथे रविवारी दाखल झाले आहेत. हे शेतकरी राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे मोर्चा काढणार आहेत. या मोर्चांत शेतकरी, कामगार ट्रॅक्टर घेऊन सहभागी होणार आहेत.
दरम्यान, राजभवनावर निघणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत आहे. महाराष्ट्रातील सुमारे 21 जिल्ह्यांमधून शेतकरी आणि कामगार हे मुंबई येथे दाखल झाले आहेत.
दरम्यान, मुंबईत होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाही सतर्क झाली आहे. मोर्चास्थळी आणि गर्दीच्या स्थळी आरोग्य अथवा स्वच्छतेच्या प्राथमिक गरजांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नयेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने आवश्यक ती सेवा पुरवली आहे.
मोर्चाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी मुंबई पोलीस सज्ज असून आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आझाद मैदानाभोवती सुमारे 100 पोलीस अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली पोलिसांच्या 500 तुकड्या तैनात केल्या आहेत. शिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या नऊ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शेतकरी आंदोलनासोबतच शेती, क्रीडा, साहित्य, समाज, संस्कृती, विज्ञान, अर्थकारण, राजकारण, उद्योगविश्व, इंटरनेट, डिजिटल वर्ल्ड आणि इतर क्षेत्रातील घटना घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.