Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

नंदुरबार, नाशिक येथे उद्या सकाळी 12 अंश सेल्सियसवर तापमान जाण्याची शक्यता; 21 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Jan 21, 2021 11:50 PM IST
A+
A-
21 Jan, 23:50 (IST)

नंदुरबार, नाशिक येथे उद्या सकाळी 12 अंश सेल्सियसवर तापमान जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात हवामान विभागाने माहिती दिली आहे. ट्वीट-

 

21 Jan, 23:02 (IST)

तमिळनाडूच्या माजी सीएम जे जयललिता यांच्या सहकारी शशिकला यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. व्हिक्टोरिया हॉस्पिटल, बेंगलुरू यांनी ही माहिती दिली.

21 Jan, 23:00 (IST)

जगतसिंहपूर जिल्ह्यातील 45 वर्षीय आशा वर्करचे 19 जानेवारी रोजी लसीकरण झाल्यानंतर 20 जानेवारी 2021 रोजी डोकेदुखी वाढली. त्यांना डीएचएच जगतसिंहपूर येथे दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. आरोग्य विभाग, ओडिशा यांनी ही माहिती दिली.

 

21 Jan, 22:25 (IST)

आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रिम्सचे संचालक डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी दिली आहे. ट्विट-

 

21 Jan, 21:50 (IST)

भारतीय गोलंदाज टी नटराजनला आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याच्या मूळ गावी सालेम जिल्ह्यात परतल्यानंतर क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. ट्विट-

 

21 Jan, 21:01 (IST)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 2886 नवे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 20,00,878 वर पोहोचली आहे.

21 Jan, 20:53 (IST)

पुणे सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत मरण पावलेल्या 5 जणांपैकी 2 यूपी, 2 पुणे आणि 1 बिहारचा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

21 Jan, 20:33 (IST)

मुंबईत मागील 24 तासांत 527 नवे कोरोनाचे रुग्ण झाले असून एकूण कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,04,649 वर पोहोचली आहे.

21 Jan, 20:16 (IST)

पुणे SII ला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना 25 लाखांची मदत दिली जाणार अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे.

21 Jan, 20:06 (IST)

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत मरण पावलेल्या मृतांना राष्ट्पती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

Load More

पारीत केलेल्या कृषी कायद्यांना दीड वर्षांपर्यंत स्थगिती देण्याची तयारी केंद्र सरकारने दर्वशवली आहे. दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी आंदोलन आणि शेतकरी एकजून यांच्यामुळे हा लढा अधिक तीव्र झाला आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात या आधी नऊ वेळा बैठक झाली. परंतू, नऊच्या नऊ वेळा चर्चा असफल झाली आणि तोडगा निघाला नाही. सरकार आणि शेतकरी यांच्यात काल (20 जानेवारी 2021) काल दहाव्यांदा बैठक पार पडली आणि कुठे थोडीशी चर्चा पुढे सरकली. केंद्र सरकारने कृषी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दीड वर्षांची स्थगिती देण्याची तयारी दर्शवली. यावर अद्याप निर्णय झाला नाही. सर्वानुमते विचार केला जाईल असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत राज्य सरकारांच्या मदतीने कोरोना लस जिल्हा पातळीवर पोहोचवली. परंतू, कोरोना लसीकरणास म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कोरोना लस उपयुक्तता, सुरक्षितता आणि परिणामकता यांबाबत साशंकता यामळे लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे. यासोबतच कोरोना लसिकरणासठी अॅपच्या माध्यमातून तयार होणाऱ्या लाभार्थींच्या यादीतही काही त्रुटी असल्यामळेही लसीकरण मोहिमेत अपेक्षीत यश येत नसल्याचे सांगितले जात आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन या चक्रात अडकलेली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. देशभरात विजेची मागणी वाढली आहे. काल म्हणजेच बुधवारी देशभरातून 1,85,822 इतक्या विक्रमी विजेची मागणी नोंदवली गेली.

कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही घोषणा केली. रस्त्यावर विनामास्क फिरणे तसेच गर्दी करणे अशा कारणांसाठी कोरोना नियमांच्या उल्लंघन प्रकरणी पोलिसांनी अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल केले होते. हे सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

कोरोना व्हायरस, कोरोना लस, मराठा आरक्षण यांसोबतच राजकारण, अर्थकारण, समाज, संस्कृती, विज्ञान आणि स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळींवरील घटना घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.


Show Full Article Share Now