Live
दक्षिण दिल्लीच्या अनेक भागात शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी सकाळी दिल्ली जल बोर्डाकडून पाणीपुरवठा नाही; 14 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Jan 14, 2021 10:59 PM IST
आज मकर संक्रांतीचा सण. भारतामध्ये विविध प्रथा, परंपरांनी हा सण साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सणाच्या निमित्ताने सुरू होणारा उत्तरायणाचा काळ तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आजच्या दिवशी तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत शुभेच्छा देण्याची पद्धत आहे.
अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्या विरूद्ध दुसर्यांदा महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिका संसद परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि नंतर ट्र्म्प यांच्या प्रतिक्रियेवर अमेरिकेत काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रिपब्लिकन पक्षातील ट्र्म्प यांच्याच काही साथीदारांनी राजीनामे देत सार्या प्रकाराबाबत निषेध नोंदवला होता.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
मुंबई मध्ये सध्या ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या कारवाईला वेग आला आहे. यामध्ये काल मुच्छड पानवाला आणि त्यापाठोपाठ एनसीबी नेते नवाब मलिक यांच्या जावयाला अटक झाल्यानंतर एनसीबीकडून रात्रभर धाडसत्र सुरू होते.