Nepal Flood Update: पूर, भूस्खलन आणि विजा पडल्यानं अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती नेपाळच्या गृहमंत्रालयानं दिली. अनेक ठिकाणचे रस्ते आणि पूलही (Nepal Flood)वाहून गेले आहेत. नेपाळचे लष्कर दल, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलीस मदत आणि बचावकार्यात गुंतले आहेत. मृतांची संख्या 224 वर गेली आहे. सरकारचे मुख्य सचिव एक नारायण अर्याल यांनी मंगळवारी दिली. (हेही वाचा: iPhone 16 Pro Max: दिल्ली विमानतळावर तब्बल 26 आयफोन 16 प्रो मॅक्स फोन्ससह महिलेला अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण)
नेपाळमध्ये तब्बल 224 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. पूर आणि भूस्खलनाच्या घटनेत तब्बल 17 अब्ज नेपाळी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. एकूण 158 लोक जखमी झाले असून 24 जण बेपत्ता आहेत. पत्रकार सभेला संबोधित करताना अर्याल म्हणाले की, शोध आणि बचाव कार्यासाठी 30,700 सुरक्षा कर्मचाऱ्यांची जमवाजमव करण्यात आली आहे. अशी माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली. शोध आणि बचाव कार्य दोन दिवसांत संपेल. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी पत्रकार बैठकीत सांगितले की, 4,000 हून अधिक पीडितांची सुटका करण्यात आली आहे. (हेही वाचा: Isha Foundation Controversy: 'आम्ही लोकांना लग्न करण्यास किंवा भिक्षुत्व स्वीकारण्यास सांगत नाही'; सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनने दिले स्पष्टीकरण)
पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची सरकारला अपेक्षा नव्हती, अशी कबूली नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंगळवारपासून नेपाळमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून तीन दिवसीय शोक देशभरातून व्यक्त केला जात आहे.