iPhone 16 Pro Max: दिल्ली विमानतळावर तब्बल 26 आयफोन 16 प्रो मॅक्स फोन्ससह महिलेला अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण
एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाने दिल्ली विमानतळावर थांबून हाँगकाँगहून येणाऱ्या महिला प्रवाशाची झडती घेतली.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी, मंगळवारी आयफोन 16 प्रो मॅक्सची तस्करी करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले. हाँगकाँगहून दिल्लीला तब्बल 26 आयफोन 16 प्रो मॅक्स फोन्सची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिला प्रवाशाला अटक केली. आयफोन 16 सिरीज मागील महिन्यात लॉन्च करण्यात आली होती आणि प्रो मॅक्स हा त्यातील सर्वात प्रीमियम फ्लॅगशिप फोन आहे. रिपोर्ट्सनुसार, कस्टम अधिकाऱ्यांना आधीच माहिती होती की, ही महिला फोन आणत होती. त्यामुळे ती भारतात आल्यावर पकडली गेली.
फोन एका छोटय़ा पिशवीत लपवून ठेवले होते आणि त्यावर टिश्यू पेपर गुंडाळले होते जेणेकरून ते कोणाला दिसू नये. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाने दिल्ली विमानतळावर थांबून हाँगकाँगहून येणाऱ्या महिला प्रवाशाची झडती घेतली. झडतीदरम्यान तिच्या व्हॅनिटी बॅगमधून 26 आयफोन 16 प्रो मॅक्स फोन्स सापडले. (हेही वाचा: Lucknow Delivery Boy Murder: फुकटात मोबाईल मिळवण्याच्या नादात डिलिव्हरी बॉयची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात फेकले, लखनौ येथील घटना)
आयफोन 16 प्रो मॅक्स फोन्ससह महिलेला अटक-
STORY | Customs officials seize 26 iPhone 16 Pro Max from woman passenger at Delhi airport
READ: https://t.co/2KmOZUvbG6 pic.twitter.com/4K0lscFku5
— Press Trust of India (@PTI_News) October 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2024 02:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

