Lucknow Delivery Boy Murder: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) ची राजधानी लखनऊ (Lucknow) मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पैसे न देता मोबाईल मिळवण्याच्या नादात दोन तरुणांनी एका डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) ची निर्घृण हत्या (Murder) केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी हत्येमागचे कारण सांगितले. आरोपींना पोलिसांना सांगितले की, त्यांनी एका ऑनलाइन शॉपिंग कंपनीच्या साइटवरून दोन मोबाईल फोन मागवले होते. पैसे न दिल्याने त्याने आधी डिलिव्हरी बॉयची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून माटी परिसरातील इंदिरा कालव्यात फेकून दिले.
हत्येची ही खळबळजनक घटना राजधानी लखनऊमधील चिन्हाट पोलीस स्टेशन परिसरात घडली. 24 सप्टेंबर रोजी फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने भारत सात्रीख रोड येथील गो डाऊनमधून मोबाईल फोन घेतला. या फोनची डिलिव्हरी करण्यासाठी तो चिन्हाट येथे गेला होता, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. यामुळे त्याचे कुटुंबीय चितेंत पडले. त्यांनी चिन्हाट पोलीस ठाणे गाठून भरत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. बेपत्ता झाल्याची नोंद केल्यानंतर पोलिसांनी भरतचा शोध सुरू केला. (हेह वाचा - Thane Murder: ठाण्यात निघृण हत्या, डोके नसलेले शरिर इमारतीच्या टेरेसवर आढळलं; पोलिस तपास सुरु)
चिन्हाट परिसरात डिलिव्हरी बॉयची हत्या -
तीन-चार दिवस पोलिसांना भरत संदर्भात कोणताही तपास लागला नाही. यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईल नंबरवर पाळत ठेवली असता, त्याचे शेवटचे लोकेशनही चिन्हाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घराजवळ सापडले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसांच्या चौकशीत दोघांनीही निशातगंज येथील डिलिव्हरी बॉय भरत याच्या हत्येची कबुली दिली. मात्र, ही हत्या कोणत्या कारणाने आणि निर्दयतेने करण्यात आली हे ऐकून पोलीसही चक्रावून गेले.
आरोपींनी फ्लिपकार्टवर मागवले 2 मोबाईल फोन -
आरोपींनी सांगितले की, त्यांनी दोन मोबाईल फोन फ्लिपकार्टवर ऑर्डर केले होते. 24 सप्टेंबर रोजी डिलिव्हरी बॉय भरत हा फोन डिलिव्हरी करण्यासाठी आला. आरोपींनी मोबाईल काढून घेतला, मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते. यावर त्याने भरतची हत्या करून मोबाईल फुकट मिळवण्याचा विचार केला. त्यानंतर दोघांनी मिळून भरतची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरून बाराबंकी येथील इंदिरा कालव्यात फेकून दिले. (हेही वाचा - Pune Vanraj Andekar murder: पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या,आरोपी फरार)
दरम्यान, दोन्ही आरोपींच्या सांगण्यावरून पोलीस मृतदेहाचा शोध घेण्यास व्यस्त आहेत, मात्र अद्यापपर्यंत मृतदेहाचा पत्ता लागलेला नाही. पोलीस आणि एसडीआरएफचे गोताखोर इंदिरा कालव्यात मृतदेहाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, हत्येतील आरोपींची नावे गजानंद आणि आकाश अशी आहेत. दोघांना अटक करून चौकशी करण्यात येत आहे.