Photo Credit- Pixabay

Indian Spices Safety Standards Fail: सिंगापूर आणि हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा नियामकांकडून MDH आणि Everest या भारतीय मसाल्यांमध्ये किटकनाशक आणि इथिलीन ऑक्साईड आढळल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. मसाल्यामंधील(Spice) हे घटक आरोग्यासाठी धोकादायक असून त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर भारताने सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये एप्रिल महीन्यात मसाल्यांची विक्री थांबवली होती, आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (Food Safety and Standards Authority)मसाल्यांची तपासणी करण्यास सुरूवात केली. ज्याचा अहवाल आता समोर आला आहे. अहवालात जवळपास 12% मसाले एफएसएसएआयच्या चाचणीमध्ये फेल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (हेही वाचा:US Rejected MDH Exports: अमेरिकेने ऑक्टोबर 2023 पासून नाकारल्या एमडीएचने निर्यात केलेल्या 31 टक्के शिपमेंट्स; समोर आले 'हे' कारण )

भारताच्या माहिती अधिकार कायद्यांतर्गत रॉयटर्सने दिलेल्या अहवालानुसार, तपास चाचणीमध्ये 4,054 नमुने तपासण्यात आले. मात्र, त्यात 474 नमुने हे गुणवत्ता आणि सुरक्षितता निकषांमध्ये फेल ठरले आहे. ही चाचणी मे ते जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काळात घेण्यात आली होती. जवळपास 12% मसाले एफएसएसएआयच्या चाचणीमध्ये फेल ठरल्याने ते गुणवत्ता आणि सुरक्षितता मापदंडांची पूर्तता करत नाहीत असे निष्कर्षात समोर आले आहे. त्याशिवाय, चाचणी केलेले मसाले ज्या कंपन्यांचे होते. त्या कंपन्यांवरही कारवाई होणर असल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. (हेही वाचा:MDH आणि काही मसाले हानिकारक? राजस्थान सरकारची महत्त्वाची कारवाई )

भारतीय मसाले सध्या जगभरात संकटाचा सामना करत आहे. विविध देशांमध्ये भारतीय मसाल्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. ज्यात उद्योगासाठी गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांची पूर्तता न करणे ही मोठी समस्या बनत आहे. आधी ब्रिटन त्यापाठोपाठ न्यूझीलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतातील मोठ्या मसाल्यांबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. भारतीय मसाले ब्रँडची कडक तपासणी सुरू आहे.

विशेष म्हणजे एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन्ही कंपन्यांनी त्यांचे मसाले पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. भारताशिवाय या दोन्ही कंपन्यांचे मसाले युरोप, अमेरिका आणि उत्तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रॉयटर्सने सादर केलेल्या माहितीनुसार तपासण्या केलेले मसाले कोणत्या कंपन्यांचे आहेत ते उघज केलेले नाही. फक्त एफएसएसएआयच्या चाचणीत अपयशी ठरलेल्या मसाल्यांचा आकजा सादर केला आहे.