Mountaineer Sheetal Raj (फोटो सौजन्य -X@taniasailibaksh)

First Indian Woman To Summit Mt. Cho Oyu: धैर्य, शक्ती, दृढनिश्चय आणि उत्कटतेच्या उल्लेखनीय पराक्रमात गिर्यारोहक शीतल राज (Sheetal Raj) ने तिबेट-नेपाळ सीमेवर असलेल्या माउंट चो ओयू (8188 मी) हा जगातील 6 व्या क्रमांकाचा पर्वत यशस्वीपणे सर केला. ही उल्लेखनीय कामगिरी करून शीतल माउंट चो ओयू (Mount Cho Oyu) सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली. या यशस्वी कामगिरीमुळे शीतलच्या गौरवशाली पर्वतारोहण कारकीर्दीत आणखी भर पडली आहे. यापूर्वी शितल राजने माउंट एव्हरेस्ट (8849 मी), माउंट अन्नपूर्णा (8091 मी), माउंट कांचनजंगा (8586 मी) ही शिखरे सर केली आहेत.

शीतलचे हे यश संपूर्ण भारतातील, विशेषतः हिमालयीन प्रदेशातील महिलांसाठी सक्षमीकरणाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. तिचा प्रवास तरुण स्त्रियांना पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यास प्रोत्साहित करतो. ही यशस्वी कामगिरी केल्यानंतर प्रतिक्रिया देताना शितलने म्हटलं आहे की, 'लिगामेंटच्या ऑपरेशननंतर सगळं संपल्यासारखं वाटत होतं, पण 12वी फेल चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा कामाला लागण्याची हिंमत आली आणि मी यशस्वी चढाई करू शकले. यासाठी मी हंस फाऊंडेशनचे मनापासून आभार मानू इच्छिते. (हेही वाचा - Kami Rita-Everest Record: गिर्यारोहक कामी रीताने मोडला विश्वविक्रम, 29 वेळी एव्हरेस्ट शिखर पार)

याशिवाय, एव्हरेस्ट विजेत्या शीतल राजने ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल इथिकल हिमालयन एक्स्पिडिशन्स आणि त्यांच्या तज्ञ पर्वतीय मार्गदर्शकांचे आभार मानले आहेत. पिथौरागढच्या उंच हिमालयीन प्रदेशातील रहिवासी असलेल्या शीतलने सांगितले की, तिच्या कुटुंबाने तिला नेहमीच चांगल्या आणि वाईट काळात साथ दिली आहे. (हेही वाचा- Priyanka Mohite, सातार्‍याची 30 वर्षीय गिर्यारोहक ठरली कांचनगंगा शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय महिला)

शीतलने यापूर्वीही अनेक यश संपादन केले आहे. शीतलला साहसी खेळासाठी देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तथापी, आदि कैलास पर्वतरांगेतील कांचनजंगा, एव्हरेस्ट, अन्नपूर्णा आणि चिपिडुंग पर्वतावर यशस्वी चढाई करणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे.

गुडघ्याला दुखापत झाल्याने करावे लागले ऑपरेशन -

दरम्यान, स्कीइंग करताना शीतल राजच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. दोन वर्षांनंतर ती पुन्हा उभी राहिली आणि तिने 35 अंश तापमानात शिखर यशस्वीरीत्या सर केले. आता 8000 मीटर उंचीचे सहा पर्वत चढण्याचे शीतलचे स्वप्न आहे. यावर्षी ती धौलागिरी आणि चोयू पर्वतावर चढणार आहे.