HC On Divorce: कुटुंबातील सदस्यांसमोर पत्नीने पतीचा उघडपणे अपमान करणे आणि त्याला नपुंसक (Impotent) म्हणणे हे मानसिक क्रूरता (Mental Cruelty) निर्माण करणारे अपमानास्पद कृत्य असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) नोंदवलं आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13 (1) (IA) अंतर्गत पत्नीला क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट मंजूर करताना हे निरीक्षण नोंदवलं.
खंडपीठाने सांगितले की, आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की इतरांसमोर पतीचा उघडपणे अपमान करणे, नपुंसक म्हटले जाणे आणि प्रतिवादीने (पत्नी) कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्याच्या लैंगिक जीवनावर चर्चा करणे, हे क्रूर मानसिक कृत्य आहे. अपीलकर्त्याचा (पतीचा) अपमान करण्याचे हे कृत्य मानसिक क्रौर्यासारखे आहे. (हेही वाचा -Wife, Housework and Divorce: घरकामास नकार, तक्रार करणाऱ्या पत्नीबद्दल दिल्ली हायकोर्टाचे मोठे निरिक्षण)
घटस्फोटाची याचिका फेटाळणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरोधात पतीने अपील दाखल केले. या जोडप्याचे 2011 मध्ये लग्न झाले. पतीने आरोप केला आहे की, त्याची पत्नी चिडखोर स्वभावाची असून ती छोट्या छोट्या गोष्टींवर भांडते. या जोडप्यान दोन वेळा IFV प्रक्रियेतून आपत्यासाठी प्रयत्न केलं. मात्र, यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनात वैवाहिक मतभेद निर्माण झाले आहेत. त्याची पत्नी सतत त्याला नपुंसक म्हणत घरच्यांसमोर अपमानित करते, असा आरोप पतीने केला आहे. (हेही वाचा, Sex Marriage Promise: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, हायकर्टाने फेटाळला विवाहीत पुरुषाचा जामीन अर्ज)
अपील स्वीकारताना खंडपीठाने सांगितले की, पत्नीच्या जाणत्या किंवा नकळत कृतीमुळे पतीला नपुंसक घोषित करून सार्वजनिक अपमान सहन करावा लागत आहे. ही वंध्यत्वाची वैद्यकीय स्थिती आहे. याशिवाय, पतीने कधीही तिच्याकडे दुर्लक्ष केले आहे किंवा त्याच्या वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरला आहे, हे दाखवण्यास पत्नीचा कबुलीजबाब सक्षम नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. (हेही वाचा -HC On Mental Strain: आर्थिक मर्यादेबाहेरची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पतीवर दबाव आणणे हे मानसिक तणावाचे कारण; दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण)
न्यायालयाने म्हटले आहे की, अपीलकर्त्याला क्रूरतेचा सामना करावा लागला. त्यामुळे घटस्फोटाची याचिका फेटाळून लावलेला निर्णय बाजूला ठेवला जातो आणि अपीलकर्त्याला हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13(1)(IA) अंतर्गत क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मंजूर केला जातो.