Maha Kumbh 2025: उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 1.7 दशलक्षाहून अधिक भाविकांनी महाकुंभ मेळ्याला भेट (Maha Kumbh 2025) दिली. महाकुंभाच्या सातव्या दिवशी, संगम त्रिवेणी येथे जमलेल्या 17 लाखाहून अधिक भाविकांपैकी 7.02 लाख भाविकांनी सकाळी 8 वाजेपर्यंत पवित्र स्नान केले. 18 जानेवारीपर्यंत, महाकुंभ 2025 दरम्यान 77.2 दशलक्षाहून अधिक भाविकांनी संगम त्रिवेणीत स्नान केले आहे. आज सकाळी, परिसरात दाट धुक्याचा थर असतानाही भाविक महाकुंभमेळ्यात जमले होते.
प्रतिकूल हवामानाचा यात्रेकरूंच्या गर्दीवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. चार प्रमुख शाही स्नान अजून येणे बाकी असल्याने येत्या काही दिवसांत यात्रेकरूंची गर्दी वाढण्याची अपेक्षा आहे. महाकुंभमेळा 13 जानेवारी रोजी सुरू झाला आणि 26 फेब्रुवारीपर्यंत चालेल. पुढील प्रमुख स्नान तारखांमध्ये 29 जानेवारी (मौनी अमावस्या - दुसरे शाही स्नान), 3 फेब्रुवारी (बसंत पंचमी - तिसरे शाही स्नान), 12 फेब्रुवारी (माघी पौर्णिमा) आणि 26 फेब्रुवारी (महाशिवरात्री) यांचा समावेश आहे. यापूर्वी 17 जानेवारी रोजी, सहाव्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत 25 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी महाकुंभाला भेट दिली, असे जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.
सोमवारी महाकुंभमेळ्याला सुरुवात झाल्यानंतर, मंगळवारी मकर संक्रांतीच्या पहिल्या अमृत स्नानात सहभागी होण्यासाठी देश आणि जगभरातून भाविक प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात दाखल झाले. भारतीय आणि परदेशी भाविकांनी पवित्र महाकुंभमेळ्यात उपस्थिती दर्शवली.