Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात बंदकीच्या धाकेवर 16 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार, आरोपी फरार
Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Madhya Pradesh Crime:  मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे 16 वर्षाच्या मुलीवर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंदूकीच्या धाकेवर मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांने बुधवारी माध्यामांना दिली. सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून आरोपी फरार असल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहे. (हेही वाचा- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकास 5 वर्षांचा कारावास)

मिळालेल्या माहितीनुसार, भंवरपूरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मंगळवारी रात्री ही घटना घडली. आरोपीने अल्पवयीन पीडित मुलीच्या पालकांवर हल्ला केला आणि तिच्यावर बलात्कार केला. रात्रीच्या वेळीस मुलगी घरा बाहेर होती दरम्यान तीन अज्ञात लोक तिच्या जवळ आले आणि तिला बळजबरीने तीच्या जवळ जाण्याच्या प्रयत्न केला. मुलीनी आरडाओरड करताच, आई वडिल घरा बाहेर आले आणि मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींकडे बंदुक होते. आरोपींनी आई वडिलांवर हल्ला केला. मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.

आई वडिलांनी मुलीला आरोंपीकडून सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींकडे हत्यार असल्यामुळे शक्य झाले नाही. मुलीवर बलात्कार करून तिघें ही घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसंनी आरोपीविरुध्दात आयपीसी कलम 323, 376, 376डी, 458, 506 आणि पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफ फेन्स) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. पीडित मुलीला रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.