Mumbai Teacher Gets 5 Years In Jail: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकास 5 वर्षांचा कारावास
Sexual Assault With Students | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Latest News: मुंबई येथील एका शिक्षकास पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावणयात आली आहे. शाळेतील तीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण (Sexual Assault) आणि लैंगिक अत्याचार (Sex Abuse) केले प्रकरणी या शिक्षकास विशेष प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (POCSO) न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. अशा घृणास्पद कृत्यांचा पीडितांवर खोल परिणाम होतो. ज्यामुळे त्यांचे भविष्य, शिक्षण आणि आत्मविश्वास खच्ची होऊन जाते, असे अधोरेखित करत विशेष न्यायाधीश एस सी जाधव यांनी हा निकाल दिला.

विद्यार्थीनीचा शाळेत जाण्यास नकार

कोर्टाने दिलेल्या 30 पानांच्या तपशीलवार निकालात गुन्ह्याची गंभीरता आणि पीडितांना सहन केलेल्या मानसिक आघातावर प्रकाश टाकण्यात आला आहे. शाळेत शिकणाऱ्या 10 वर्षांच्या मुलींपैकी एका मुलीने जवळपास एक आठवडा शाळेत जाण्यास नकार दिला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याकडे शाळेत न जाण्याच्या कारणासा शोध घेतला असता हे प्रकरण उघडकीस आले. मुलीने दिलेली माहिती धक्कादायक होते. ज्यामुळे कुटुंबीय हादरुन गेले. त्यांनी तातडीने पोलिसांशी सपर्क साधला. पोलिसांनी केलेल्या तपासात शैक्षणिक संस्थेमधील शिक्षकाच्या विद्यार्थ्यांसोबत सेक्स प्रकरणाची धक्कादायक घटना पुढे आली. (हेही वाचा, Female Teacher's Sex With Student: अल्पवयीन मुलासोबत शेतात लैंगिक संबंध; मास्तरीण बाईंच्या शिकवणीवर आजीवन बंदी)

कोर्टाकडून कठोर भाष्य

कोर्टाने आपल्या निर्णयात मुलांच्या मनावर होणाऱ्या आघातांच्या बाबींवर जोर दिला. अशा प्रकारचे अत्याचार उघडकीस आणताना पीडितांना विचित्र मनोभावनेतून जावे लागते. इतकेच नव्हे तर तपास करतानाही यंत्रणेला पीडितांच्या बाबतीत येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शिक्षण आणि वाढीसाठी अनुकूल सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्याची शिक्षकांची जबाबदारी असताना अशा घटना घडणे गंभीर असल्याचे मत कोर्टाने नोंदवले. (हेही वाचा, Teacher's Sex Acts With Minor Boy: अमेरिकेत शाळेत 16 वर्षीय मुलासोबत शिक्षिकेचे शारीरिक संबंध; आरोपी अटकेत)

सरकारी वकिलांचा जोरदार युक्तीवाद

दरम्यान, विशेष सरकारी वकील कल्पना हिरे यांनी तीन मुलींच्या साक्षीचा दाखला देत, शोषण आणि अत्याचारापासून बालकांचे रक्षण करण्याचे महत्त्व पटवून देत आरोपींना शिक्षा होण्यासाठी जोरदार युक्तीवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या अनुपस्थितीमुळे पीडितांच्या साक्षीची विश्वासार्हता कमी होत नाही, यावर वकीलांनी जोर दिला.

शालेय विद्यार्थ्यांचे होणारे लैंगिक शोषण हा सामाजिक चिंतेचा मुद्दा ठरतो आहे. केवळ भारतच नव्हे तर जगभरातील विविध देशांमध्यूनही बैल लैंगिक शोषणाबद्दल अनेक बातम्या, घटना, तक्रारी पुढे येत असतात. अलिकडेच अमेरिकेतील एका महिला शिक्षकाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातही सदर शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अश्लिल संवाद साधला होता. त्याला तसे फोटो पाठवले होते. शिवाय त्याच्यासोबत शेतामध्ये लैंगिक संबंधही प्रस्तापीत केले होते. या महिला शिक्षकावर आजन्म शिक्षकी पेशा स्वीकारण्यासही बंदी घातली गेली.