Sex With Student: शिक्षिकेने केला 15 वर्षीय विद्यार्थ्यासोबत सेक्स, गर्भवती झाल्याचा दावा
Sex With Student | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

एका विवाहित शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यासोबत शरीसंबंध (Sex With Student) ठेवले. परिणामी शिक्षिका गर्भवती राहिली आहे. शरीसंबंधांनतर गर्भवती राहणे ही अगदीच सर्वसामान्य प्रक्रिया असली तरी हे प्रकरण तितके सर्वसामान्य नाही. ही विवाहित शिक्षिका (Married Teacher) आपल्या विद्यार्थ्यासोबत सेक्स करुन तेवढ्यावरच थांबली नाही. तर तिने या संबंधावेळी टिपलेली खासगी आणि नग्नावस्थेतील छायाचित्रे (Nude Photos) त्या विद्यार्थ्याला पाठवली. यात आणखी धक्कादाक असे की, हा विद्यार्थी अल्पवयीन म्हणजे अवघा 15 वर्षांचा आहे. या प्रकरणावरुन सध्या जनमानसातील वातावरण भलतेच तापले आहे. आता तुम्हला उत्सुकता लागली असेलच. हा प्रकार नेमका कुठे आणि कसा घडला. घ्या जाणून.

इंग्लंडमधील Buckinghamshire School मध्ये अध्यापन करणाऱ्या विवाहीत 35 वर्षीय शिक्षिका कैंडिस बार्बर (Kandice Barber) हिच्यावर आरोप आहे की, तिने विद्यार्थी असलेल्या मुलासोबत शरीरसंबंध ठेवल्यामळे ती गर्भवती राहिली आहे. तसेच, कॅंडिस बार्बर हिने कामुक कृती करत सेक्स टॉईज सोबत उत्तान अशी छायाचित्र कथीत स्वरुपात विद्यार्थ्याला पाठवली. ही छायाचित्रे पाठवून पुढे तिने विद्यार्थ्याला सांगितले की तू अगदीच तंदुरुस्त आणि उत्साही आहेस. शिक्षिकेवर असाही आरोप करण्यात आला आहे की, ही शिक्षिका स्वत:ची मुलं शाळेत जाण्याच्या वयात असताना तिने अशा प्रकारची कृती केली आहे. तिने या मुलाला सप्टेंबर 2018 पासूनच अशा प्रकारचे संदेश पाठविणे सुरु केले होते. (हेही वाचा, Who Is Aasia Zubair? लाहोर येथे ‘Sexy-Figure’ असल्याचे कारण सांगून निलंबित केलेली शिक्षिका म्हणून व्हायरल होत आहे Indian Influencer Zoya Shaikh चा फोटो; जाणून घ्या सविस्तर )

हा खटला आयलेसबरी क्राउन कोर्टासमोर सुरु आहे. कोर्टात सांगण्यात आले की, या शिक्षिकेने या मुलाचा फोन मागून घेतला आणि त्यात आपले स्नॅपचॅट अकाऊंटचे तपशील भरले. पुढे या शिक्षिकेने या मुलाला संदेश पाठविण्यास वारंवार सुरुवात केली. एकदा तर तिने हद्दच केली. तिने मुलाला संदेश पाठवला की ती अंघोळ करत आहे आणि अशा अवसस्थेत तो तिला पाहू इच्छितो काय? त्यानंतर शिक्षिका कैंडिस बार्बर हिने त्या मुलाला स्वत:च्या वाहनातून शेतात नेले आणि तिथे एकांतात त्याच्यासोबत सेक्स केला.

विद्यार्थ्यासोबत सेक्स करण्यापूर्वी या शिक्षिकेने त्याला आपली नग्न छायाचित्रे पाठवली होतीच. सेक्स करण्यासाठी हे दोघे फक्त दोनच वेळा भटले आहेत. कारण तोपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत या दोघांची एकांतातील (सेक्स करतावेळची) छायाचित्रे पहोचली होतीच. न्यायालयात सांगण्यात आले की, 2018 मध्ये मुख्याध्यापकांनी ही छायाचित्रे पाहिली होती. शिक्षिका कैंडिस बार्बर हिला गेल्या वर्षी पोलिसांनी अटक केले होते. डेली मेल युके ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, आपल्या शिक्षिकेसोबत अशा प्रकारचे लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपाचे विद्यार्थ्याने खंडण केले होते. मात्र, पुढे याच विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले की, मी पहिल्यांदा खोटे बोलोलो होतो. कारण, शिक्षिकेने त्याला सांगतले होते की, ती त्याच्या बाळाची आई बणणार आहे. त्यामुळे आपण अशा कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवल्याचे आरोप फेटाळले. तसेच, शिक्षिकेने सांगितले होते की, जर आपल्या संबंधांबाबत कुठे वाच्यता करशील तर मी तुझे जगणे मुश्लिल करेन. मी शिक्षिकेला असेही म्हटले की, तू माझ्यावर बलात्काराचा आरोप करणार आहेस काय? तर तिने थेट काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे मलाही प्रचंड राग आला होता. शेवटी विद्यार्थ्यानेही या लैंगिक संबंधांबाब कबुली दिली आहे.

प्रॉसिक्यूटर रिचर्ड मिल्ने यांनी न्यायालयात सांगितले की शिक्षिका कैंडिस बार्बर ही जेव्हा विद्यार्थ्याला भेटली तेव्हा तिला बरेच विचित्र वाटले होते. कारण हा मुलगा तिच्या मुलाचाही दोस्त होता.