Who is Aasia Zubair? (Photo Credits: Twitter and Instagram)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की, आसिया जुबैर (Aasia Zubair) नावाच्या पाकिस्तानी शिक्षिकेला (Pakistani Teacher) ‘सेक्सी फिगर’ (Sexy-Figure) असल्याबद्दल शाळेने निलंबित केले आहे. होय, ऐकायला थोडे विचित्र आहे मात्र हे खरे आहे. ही व्हायरल बातमी पाकिस्तानच्या ‘रिपब्लिक ऑफ बझ’ (Republic Of Buzz) या संस्थेने, 'सेक्सी फिगर' असल्याने शिक्षिका निलंबित- लाहोर', अशा हेडलाईनने चालवली होती. साहजिकच या वृत्ताने इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्विटर युजर्स, नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले. मात्र आता समोर आले आहे की, या बातमीसाठी ज्या मुलीचा फोटो वापरण्यात आला होता ती खरी आसिया जुबैर नाहीच, तर ती आहे भारतीय इंफ्लूएन्सर झोया शेख.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये शिक्षिकेला कामुक असल्याचे कारण सांगून टर्मिनेशन पत्र देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या पोस्टमध्ये पांढर्‍या सलवार कमीजमधील मुलीचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. अगदी कमी वेळात ही बातमी बातमी व यासोबत वापरण्यात आलेल्या मुलीचा फोटो व्हायरल झाला होता.

पाकिस्तानी मिडियाने आसिया जुबैर नावाच्या 30 वर्षीय शिक्षिकेला सेक्सी फिगर असल्याचे कारण सांगत निलंबित केल्याचे वृत्त दिले होते. याबाबत त्यांनी एक ट्वीट केले होते (आता हे ट्वीट डिलीट केले आहे). या वृत्तासोबत वापरण्यात आलेला फोटो @AasiaZubair908 या ट्वीटर खात्यावरून घेण्यात आला होता. त्यानंतर याच खात्यावरून ‘रिपब्लिक ऑफ बझ’ची बातमी पोस्ट करण्यात आली होती, मात्र त्यावेळी या खात्याचा प्रोफाईल फोटो दुसऱ्याच मुलीचा होता.

 

View this post on Instagram

 

Jumma Mubarak❤️... #jummahmubarak #staypositive #stayhumble #instadaily #followmeto

A post shared by zoya shaikh (@zoya_shaikh.786) on

मात्र इथे ‘रिपब्लिक ऑफ बझ’कडून एक मोठी चूक झाली. त्यांनी ही बातमी प्रकाशित करताना पांढरा सलवार व लाल ओढणी घेतलेल्या मुलीचा फोटो वापरला होता, मात्र बातमीच्या आत असलेल्या मुलीचा फोटो वेगळाच आहे (कदाचित ती मूळ आसिया जुबैर असावी). सोशल मिडियावर मात्र पांढरा सलवार व लाल ओढणी घेतलेल्या मुलीलाच आसिया जुबैर समजले जाऊ लागले. परंतु ती खरी आसिया जुबैर आहे? उत्तर आहे नाही. ही पांढरा सलवार व लाल ओढणी घेतलेली मुलगी आहे भारतीय इंफ्लूएन्सर झोया शेख. (हेही वाचा: Aasia Zubair, Pakistani Teacher Suspended For Having Sexy Figure: लाहोर मध्ये शिक्षिका आसिया जुबैर यांना सेक्सी फिगर मुळे कामावरुन काढलं?)

तर झोया शेखचा फोटोशॉप केलेला फोटो पाकिस्तानी न्यूज वेबसाइटने त्यांच्या बातमीसाठी वापरला व नंतर चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन प्रसारित केला. मॉडेल व इंफ्लूएन्सर असलेल्या झोयाने 14 फेब्रुवारी 2020 रोजी काही फोटो पोस्ट केले होते, त्यामध्ये तिने हेच पांढरा कुडता व लाल ओढणी घेतलेली दिसत आहे. याआधी झोया एका म्युझिक व्हिडीओमध्येही दिसून आली होती.

तर अशा प्रकारे हे सिद्ध झाले आहे की, पाकिस्तानच्या शाळेतून ज्या शिक्षिकेला निलंबित केले ती ही पांढरा सलवार व लाल ओढणीमधील मुलगी नाही.