Female Teacher's Sex With Student: अल्पवयीन मुलासोबत शेतात लैंगिक संबंध; मास्तरीण बाईंच्या शिकवणीवर आजीवन बंदी
Sex With Student | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Sex With Student: युनायटेड किंग्डममधील (UK) एका शिक्षीकेच्या शिकवणीवर आजन्म बंदी घालण्यात आली आहे. सदर मास्तरीण बाईंनी चक्क एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत शेतामध्ये लैंगिक संबध प्रस्तापीत केले. या कारणामुळे शिक्षिकेला व्यवसायातून आजीवन बंदी घालण्यात आली आहे. कॅंडिस बार्बर (Kandice Barber) असे या शिक्षीकेचे नाव आहे. ती 38 वर्षांची आहे. बकिंगहॅमशायर येथील प्रिन्सेस रिसबरो स्कूल मध्ये शिकवत असताना एका विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध (UK Teacher Sex With Student) ठेवल्याबद्दल 2021 मध्ये तिला सहा वर्षे आणि दोन महिन्यांची तुरुंगवास भोगावा लागला.

मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन निर्णय

टीचिंग वॉचडॉग्सने या घटनेची दखल घेत दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, शिक्षका म्हणून कॅंडिस बार्बर हिने विद्यार्थ्यासोबत सेक्स अत्यंत उदासीन आणि स्वार्थी वर्तन केले. तिच्या वागण्यामुळे मुलांमध्ये चुकीचे संस्कार घडतील तसेच पालकांनाही आपल्या मुलांच्या भविष्याबातब चिंता निर्माण होईल. दरम्यान, या प्रकरणात नुकत्याच झालेल्या गैरवर्तणुकीच्या सुनावणीदरम्यान, बार्बरला अध्यापन रजिस्टर अनिश्चित काळासाठी काढून टाकण्यात आले आणि पुन्हा कधीही शिकवण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी नाकारण्यात आली. पॅनेलच्या अहवालात म्हटले आहे की, तिचे वर्तन इतके भयानक आणि हानिकारक होते की तिला भविष्यात शिकवण्याची परवानगी आजन्म नाकारण्याशिवाय कोणता दुसरा पर्यायच नव्हता. (हेही वाचा, Teacher's Sex Acts With Minor Boy: अमेरिकेत शाळेत 16 वर्षीय मुलासोबत शिक्षिकेचे शारीरिक संबंध; आरोपी अटकेत)

शेतात केला सेक्स

सुनावणीच्या वेळी, अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. जसे की, तीन मुलंची आई कॅंडिस बार्बर या शिक्षिकेने विद्यार्थ्याला 2018 पासून मेसेज करत होती. तिने त्याला फूस लवून शेतात नेले आणि त्याच्यासोबत सेक्स केला. तिने स्नॅपचॅटवर मजकूर पाठवून म्हटले की, मी शिकवत असताना तू मला लाजवू शकत नाहीस. सदर शिक्षिकेने काही अश्लिल फोटोही विद्यार्थ्याला पाठवले होते. या शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या शालेय संमेलनादरम्यान मुलांना मेसेज पाठवले आणि त्यांच्याशी फ्लर्ट केले. ज्यामधील एका मसेजमध्ये तिने म्हटले होते की, तुला b**bs किंवा b*m आवडते का?" ती इतक्यावरच थांबली नाही. तिने सेक्स टॉयसोबत बेडवर एक फोटो काढला आणि तो मुलाला पाठिवला. तसेच, मुलाला धमकी दिली की, दोघांमध्ये झालेला संवाद जर तिने इतर शिक्षक किंवा घरातील लोकांना सांगितला तर त्याला शिक्षा दिली जाईल.  (हेही वाचा, Sex With Student: शिक्षिकेने केला 15 वर्षीय विद्यार्थ्यासोबत सेक्स, गर्भवती झाल्याचा दावा)

शिक्षिकेने फेटाळले आरोप

दरम्यान, आपल्यावर झालेले सर्वच आरोप महिला शिक्षकाने नाकारले. तिने दावा केला की, आपण लिहिलेल्या मजकूराची मांडणी काहीशी चुकीची होती. पण मी निर्दोष आहे. आपला मुलाशी लैंगिक हेतून संवाद साधण्याचा कोणताच हेतू नव्हता. आपण त्याच्याशी केवळ गप्पा मारत होतो. मात्र, या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या समितीला मात्र आढळून आले की, बार्बरने मुलाशी "अयोग्य आणि लैंगिक सूचक पद्धतीने" संवाद साधला होता.

शिक्षण सचिव सारा बक्से यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत म्हटले आहे की, मला वाटते आरोपच्या मनात केलेल्या कृतीबद्दल कोणताही पश्चाताप नसणे याचा अर्थ त्याला माफ केल्यास अथवा शिक्षेत सवलत दिल्यास भविष्यातही अशा प्रकारचे कृत्य करण्याच्या धोक्यास जागा करुन देणे आहे. त्यामुळे मला वाटते सार्वजनिक हिताचा विचार करता चौकशी समितीने (पॅनलने) घेतलेला निर्णय बरोबर आहे. तिच्यावर व्यावासायिक शिक्षणावर आजन्म बंदी घालणे योग्य आहे.

महत्त्वाचे म्हणजे तिचा पती, डॅनियल बार्बर, जो तिच्या चाचणीच्या वेळी तिच्या पाठीशी उभा होता, त्याने आता तिच्याशी संबंध तोडले आहेत. सध्यात तो दुसऱ्या महिलेसोबत राहात आहे.