लॉकडाऊन काळात सोशल डिस्टंन्सींगचे उल्लंघन करत भाजप खातदार मनोज तिवारी यांनी खेळले क्रिकेट; हरियाणातील सोनिपत येथील प्रकार
भाजप खातदार मनोज तिवारी (Photo Credit: ANI)

लॉकडाउन (Lockdown) दरम्यान क्रिकेट खेळण्यासाठी दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) हे हरियाणामधील सोनीपत (Sonipat) येथे पोहचले. यावेळी त्यांनी सामाजिक अंतर न पाळण्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेकदा सोशल डिस्टंसिंगचे आवाहन करत असताना त्यांच्या पक्षाचे काही नेते अजिबात काळजी करत नाहीत. मनोज हे सोनिपतच्या गन्नोर येथे चेहऱ्यावर मास्क न घालता क्रिकेट खेळताना दिसले. सामन्यादरम्यान सामाजिक अंतराचेही (Social Distancing) उल्लंघन केले गेले. हरियाणा सरकारच्या आदेशानुसार खेळाडू आणि सामान्य लोक खेळायला स्टेडियममध्ये जाऊ शकतात पण तिथे गर्दी जमू शकत नाही. पण शेखपुरा (Sheikhpura) गावच्या क्रिकेट अ‍ॅकॅडमीत मनोज तिवारींनी गर्दी जमवली आणि येथे त्यांनी मास्क न घालता आणि सामाजिक अंतरांची काळजी न घेता क्रिकेट खेळला. (नेट्समध्ये दिव्यांग मुलाची घातक गोलंदाजी पाहून व्हीव्हीएस लक्ष्मण थक्क, पाहून तुम्हीही कराल सलाम, पाहा प्रेरणादायी Video)

गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाउनही सुरू आहे. पण, भाजप खासदार मनोज तिवारी सरकारकडून तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन करत क्रिकेट खेळण्यासाठी पोहोचले. हरियाणा सरकारने संघ खेळासाठी केवळ 18 खेळाडूंच्या प्रवेशास परवानगी दिली आहे. लॉकडाउन दरम्यान क्रिकेट स्टेडियमवर मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत टी-20 सामन्यातही नियमांचे उल्लंघन केले गेले. 18 हून अधिक खेळाडू स्टेडियममध्ये दाखल झाले. याशिवाय स्टेडियममध्ये बरीच लोकं प्रेक्षक म्हणून उपस्थित होती. सामन्यात सोशल डिस्टंसिंग देखील विचारात घेतले गेले नाही. मनोज यांनी ट्विटरवर सामन्याचा व्हिडिओ पोस्ट केला. "देव सर्वांना क्रीडा भावनेने भरुन ठेवो... प्रत्येकजण निरोगी असो... प्रत्येकाची प्रतिकारशक्ती बळकट असावी..." मनोज यांनी व्हिडिओसह ट्विट केले.

पाहा हे फोटोज

या प्रकरणावर मनोज तिवारी यांची अद्याप कोणतीही प्रक्रिया आली नाही. मात्र, सोशल मीडिया यूजर्स त्यांच्यावर कसून टीका करत आहे. दरम्यान, भारतात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी पहिले लॉकडाउन जाहीर केले, जे 25 मार्चपासून अंमलात आले. सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा काही सवलतींसह 31 मेपर्यंत सुरू राहणार आहे. तथापि, लॉकडाउन असूनही, देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत जात आहे.