Mission Gaganyaan (PC - Twitter/ @isro)

Gaganyaan Mission: गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण इस्रोने (ISRO) थांबवले आहे. प्रक्षेपणाच्या अगदी आधी, अंतराळ संशोधन संस्थेने त्याचे प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय घेतला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शनिवारी गगनयान मोहिमेतील पहिले अनक्रूड चाचणी उड्डाण (TV-D1 फ्लाइट टेस्ट) प्रक्षेपण रद्द केले. गगनयानची पहिली फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (TV-D1) प्रक्षेपण थांबवण्यात आले आहे. पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले.

एस. सोमनाथ यांनी गगनयानचे पहिले चाचणी वाहन अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) चे प्रक्षेपण होल्डवर ठेवण्याबाबत माहिती दिली. कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, 'गगनयान मोहिमेच्या चाचणी वाहनाचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न आज होऊ शकला नाही. वाहन सुरक्षित आहे. आम्ही लवकरच परत येऊ. कार्यरत असलेल्या संगणकाने प्रक्षेपण थांबवले आहे. आम्ही त्याचे निराकरण करू आणि लवकरच लॉन्च शेड्यूल करू.' (हेही वाचा - Chandrayaan 3 Mission Update: चंद्रावर सूर्योदय,  Vikram lander आणि Pragyan rover पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता)

गगनयान मोहिमेचा एक भाग म्हणून क्रू एस्केप सिस्टीमच्या कामगिरीचे प्रात्यक्षिक करण्यासाठी ही फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन आयोजित केली जाते. रॉकेट प्रक्षेपणानंतर बंगालच्या उपसागरात सुरक्षित लँडिंगची चाचणीही घेणार आहे. मानवांना अंतराळात पाठवणे शक्य आहे हे दाखवून देण्याच्या भारताच्या प्रयत्नातील हे मिशन महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. चाचणी उड्डाण प्रकल्पाचे उद्दिष्ट मानवांना 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठवण्याची आणि बंगालच्या उपसागरात स्प्लॅशडाउनसह सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याची भारताची क्षमता सिद्ध करणे हे आहे.

दरम्यान, गगनयान हे भारताचे पहिले अंतराळ अभियान आहे, ते पुढील वर्षाच्या अखेरीस किंवा 2025 च्या सुरुवातीला पाठवले जाऊ शकते. 2024 मध्ये एक मानवरहित चाचणी उड्डाण होईल, ज्यामध्ये व्योमामित्र रोबोट पाठवला जाईल.