Photo Credit- X

Couple’s Dispute Over Baby Name: कर्नाटकमध्ये मुलाच्या नावावरून एका जोडप्यामधील भांडण इतके वाढले की प्रकरण घटस्फोटापर्यंत (Divorce) पोहोचले. प्रकरण इतके वाढले की हे प्रकरण उच्च न्यायालयात(Karnataka Court) पोहोचले. आनंदाची बाब म्हणजे उच्च न्यायालयाने हा वाद मिटवला आणि पती-पत्नी पुन्हा एकत्र आले. न्यायालयात चार न्यायाधीश आणि अन्य न्यायिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलाच्या पालकांनी एकमताने नाव निश्चित केले. आणि मग जोडप्याने एकमेकांना हार घालून तीन वर्षांची कटुता मागे टाकत सामंजस्याने पुन्हा प्रवास सुरू केला.

वाद काय होता?

हे प्रकरण 2021 मध्ये सुरू झाले. जेव्हा महिलेने मुलाला जन्म दिला. मुलाच्या नामकरणावरून पती-पत्नीमध्ये मतभेद होते. नव्याने आई झालेल्या महिला आपल्या मुलाला 'आदि' म्हणून हाक मारू लागल्या. हे नाव कोणत्याही सरकारी संस्थेकडे अधिकृतपणे नोंदणीकृत नव्हते. नवऱ्याला हे नाव मान्य नव्हते. महिलेने तिच्या पतीने निवडलेले नाव स्वीकारण्यास नकार दिला. अनेक महिने वाद सुरू राहिल्यानंतर महिलेने म्हैसूर येथील न्यायालयात धाव घेतली आणि पतीकडे घटस्फोट आणि पोटगीची मागणी केली. हळूहळू यात दोन वर्षे निघून गेली आणि प्रकरण तिसऱ्या वर्षात पोहचले.

न्यायालयात प्रकरण कसे सोडवले गेले?

हे प्रकरण प्रथम स्थानिक न्यायालयात गेले आणि नंतर लोक अदालतकडे गेले. जे अशा प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी मध्यस्थीची मदत घेते. मध्यस्थीनी अनेक प्रयत्न करूनही हे जोडपे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. शेवटी न्यायालयाला निर्णय घ्यावा लागला. न्यायालयाने मुलाचे नाव ‘आर्यवर्धन’ ठेवले, म्हणजे ‘श्रेष्ठतेचे प्रतीक’. हे नाव दोन्ही पालकांनी स्वीकारले होते.

निकालानंतर भारतीय परंपरेनुसार जोडप्याने एकमेकांना पुष्पहार घालून सहमती व्यक्त केली. हे पाऊल त्यांच्यातील मतभेदांच्या समाप्तीचे प्रतीक होते आणि ते लग्न वाचविण्यात यशस्वी झाले.