कर्नाटक पोटनिवडणूक 2019: येडियुरप्पा सरकार वाचले ; काँग्रेसने स्वीकारला पराभव
BS-Yediyurappa (Photo Credit: Facebook)

कर्नाटक येथील (Karnataka Assembly Bypolls 2019 Results) बंडखोर आमदारांवरील कारवाईनंतर हायकोर्टाच्या आदेशाने 15 मतदारसंघात नुकत्याच पोटनिवडणुका घेण्यात आल्या आहेत. आज मतमोजणी सुरु असून भाजपकडून (BJP) जोरदार प्रदर्शन पाहायला मिळाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) पराभव स्वीकारल्याचे चिन्ह दिसत आहे. आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार भाजप आघाडीवर आहे, तर जेडीएस (JDS) पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. यातच राज्यात येदियुरप्पा सरकार (B. S.Yediyurappa Government) स्थापन होण्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने 2 जागेवर विजय मिळवला असून 10 मतदारसंघात आघाडीवर आहे. यामुळे कर्नाटक पोटनिवडूकीचा निकाल पाहता यदियुरप्पा आणि त्यांचे पुत्र बीव्हाय विजयेंद्र हे आनंद साजरा करताना दिसले. एकीकडे भारतीय जनता पक्षाचा विजय होत आहे तर, दुसरीकडे काँग्रेस पक्ष पराभावाच्या उंबरठ्यावर असल्याचे चिन्ह दिसत आहेत. यावर काँग्रेस नेते शिवकुमार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आम्हाला जनेतचा कौल मान्य करावा लागेल. जनतेने पक्षांतर केलेल्या नेत्यांना स्वीकारले आहे,असे शिवकुमार म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजप अधिक मतदारसंघात काँग्रेस आणि जेडीएस यांच्या तुलनेत आघाडीवर होता. तर एका मतदारसंघात अपक्ष आघाडीवर आहे. कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळवण्यासाठी 15 पैंकी 6 मतदारसंघात विजय मिळवणे गरजेचे आहे. हे देखील वाचा-नागरिकत्व सुधारणा विधेयक: मोदी, शाह साहस दाखवा! हे सहज शक्य आहे-शिवसेना

एएनआयचे ट्वीट-

येल्लापूर येथून भाजप उमेदवार अराबैल शिवराम हेब्बार हे कर्नाटक पोटनिवडणूकीत 15 मतदारसंघात विजय मिळवणारी पहिले उमेदवार बनले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भीमण्ण नाईक यांना 31 हजारहून अधिक मतांनी मात दिली होती. सध्या इतर मतदारसंघाची मतमोजणी सुरु आहे. दरम्यान, भाजपचे आणि काँग्रेसने 15 मतदारसंघात तर जेडीएस यांनी १२ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते.