पश्चिम बंगालचे (West Bengal) राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) उपराष्ट्रपतीपदासाठी (Vice President) एनडीएचे (NDA) उमेदवार असतील. भाजपच्या (BJP) संसदीय पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आदींचाही सहभाग होता. बैठकीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यांनी जगदीप धनखर यांना शेतकऱ्याचा मुलगा असे संबोधले. जगदीप धनखर यांचा पश्चिम बंगालमधील कार्यकाळ वादांनी भरलेला होता. त्यांची आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात अनेकदा बाचाबाची होते. जगदीप धनखर यांना या पदासाठी उमेदवार बनवण्यामागे अनेक पैलू आहेत. चला जाणून घेऊया जगदीप धनखरबद्दल.
1951 मध्ये जन्म
जगदीप धनखर यांचा जन्म 18 मे 1951 रोजी झाला. त्यांचे वडील चौधरी गोकुळचंद धनखर हे शेती करायचे. पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे ते सदस्यही राहिले आहेत. एकेकाळी राजस्थानच्या राजकारणातील ते प्रसिद्ध चेहरा होते. ते सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आणि राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्षही राहिले आहेत.
Tweet
Shri Jagdeep Dhankhar Ji has excellent knowledge of our Constitution. He is also well-versed with legislative affairs. I am sure that he will be an outstanding Chair in the Rajya Sabha & guide the proceedings of the House with the aim of furthering national progress. @jdhankhar1 pic.twitter.com/Ibfsp1fgDt
— Narendra Modi (@narendramodi) July 16, 2022
2003 मध्ये केला भाजपमध्ये प्रवेश
राजस्थानमध्ये जाटांना आरक्षण मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धनखर हे स्वतः राजस्थानच्या जाट समाजातून आलेले आहेत. धनखर यांना या समाजात चांगली प्रतिष्ठा आहे. धनखर 1989 ते 91 पर्यंत झुंझुनू येथील जनता दलाचे सदस्य होते. मात्र, नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजमेरमधून ते काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक हरले. धनखर यांनी 2003 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि अजमेरमधील किशनगडमधून आमदार म्हणून निवडून आले.
1989 मध्ये खासदार
जगदीप धनखर हे मूळचे झुंझुनूच्या किथाना गावचे आहे. धनखर यांची आयआयटी, एनडीए आणि आयएएससाठी निवड झाली होती, परंतु त्यांनी वकिलीची निवड केली. 1989 मध्ये जनता दलाकडून खासदारकीची निवडणूक लढवली, विक्रमी मतांनी विजयी झाले. जगदीप धनखर यांचे प्राथमिक शिक्षण किठाणा गावातील सरकारी माध्यमिक विद्यालयातून झाले. त्यांनी जयपूरच्या महाराजा कॉलेजमधून भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली आहे. यानंतर 1978-79 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली. (हे देखील वाचा: Unparliamentary Language Row: 'कोणत्याही शब्दावर बंदी नाही', असंसदीय शब्दांच्या वादावर लोकसभा अध्यक्ष Om Birla यांचे स्पष्टीकरण)
चंद्रशेखर सरकारमधील मंत्री
जगदीप धनखर यांनी राजस्थानच्या बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 1990 पासून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 1979 मध्ये सुदेश धनखर यांच्याशी तिचा विवाह झाला होता. 1989 मध्ये झुंझुनूमधून खासदार झाल्यानंतर धनखर हे चंद्रशेखर सरकारमध्ये मंत्रीही होते. 20 जुलै 2019 रोजी त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हापासून ते सतत चर्चेत आहेत.