पगारासाठी Jet च्या कर्मचाऱ्यांनी घेतली अरुण जेटली यांची भेट; कंपनीला तारण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज उत्सुक?
जेटच्या कर्मचाऱ्यांनी घेतली अरुण जेटली यांची भेट (Photo Credit- Twitter)

25 वर्षांपासून बाजारात असलेली, विमानसेवा पुरवणारी कंपनी जेट एअरवेज (Jet Airways) अखेर बंद झाली. विविध 26 बँकांचे कर्ज जेटवर होते,  त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या कंपनीने अखेरचा श्वास घेतला. 10 मे रोजी या कंपनीच्या बोली प्रक्रियेबाबत निर्णय होणार आहे. आता सरकारी मालकीची कंपनी एअर इंडियाही (Air India) त्याच मार्गावर वाटचाल करीत आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीजने एअर इंडियात रस दाखविला आहे. कंपनी एअर इंडियाची खरेदी करण्याचा विचार करत आहे.

जेटला वाचवण्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाने कर्ज देण्यास नकार दिला, त्यामुळे कोणीच तारणहार न मिळाल्याने जेट बंद झाली. आता कर्जदात्या बँक समूहांनी जेट एअरवेज विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इच्छुक कंपन्यांकडून इच्छापत्रे मागवण्यात आली आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज यूएईस्थित एतिहाद एअरवेजच्या निविदेत नंतर सहभागी होणार आहे. (हेही वाचा: Jet Airways च्या 500 कर्मचाऱ्यांना SpiceJet ने दिली नोकरी; 27 नवीन विमाने घेऊन मार्ग वाढवण्याचा मानस)

एयर इंडियाची सध्या अशीच परिस्थिती आहे. दिवसेंदिवस एयर इंडियाचा कर्जाचा बोझा वाढत आहे. यामुळे एअर इंडियाच्या विक्रीचा प्रयत्न गेल्या वर्षी केला होता. तथापि, खरेदीदारच न मिळाल्याने हा प्रयत्न फसला. त्यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रीजने एअर इंडियात रस दाखविला आहे. दरम्यान जेट बंद झाल्याने हजारो लोकांची नोकरी गेली आहे. त्यात जेटने तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी केंद सरकारकडे साकडे घातले आहे. नुकतेच त्यांनी यांनी याबाबत वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. कमीत कमी 1 महिन्याचा तरी पगार दिला जावा असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अरुण जेटली यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

तसेच स्पाइसजेट (SpiceJet) या कंपनीने जेटच्या 500 कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे. स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, आता कंपनी वाढत आहे, त्यामुळे नवी नोकरी देऊ करताना पहिले प्राधान्य जेटच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणार जाईल. यामुळे काही प्रमाणात तरी जेटच्या माजी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.