Jain Muni Acharya Vidyasagar Maharaj Dies: डोंगरगड येथील चंद्रगिरी पर्वतावर जैन ऋषी आचार्य विद्यासागर महाराज (Jain Muni Acharya Vidyasagar Maharaj) पंचतत्त्वात विलीन झाले. आचार्य विद्यासागर महाराजांनी रात्री अडीच वाजता समाधी घेतली होती. छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जैन साधू पंचतत्त्वात विलीन झाल्यानंतर छत्तीसगड सरकारने अर्ध्या दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीत, राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील. तसेच राज्यात कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. इंदूर हे एकमेव शहर आहे जिथे आचार्य विद्यासागर जी महाराज यांनी आपले बहुतेक संतमय जीवन व्यतीत केले आहे.
पीएम मोदींनीही वाहिली श्रद्धांजली -
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जैन साधू आचार्य विद्यासागर जी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'माझे विचार आणि प्रार्थना आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या असंख्य भक्तांसोबत आहेत. समाजातील अध्यात्मिक प्रबोधनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांनी केलेले अमूल्य योगदान, आरोग्य सेवेसाठी त्यांनी केलेले कार्य यासाठी येणाऱ्या पिढ्या त्यांच्या स्मरणात राहतील.' (हेही वाचा -PM Modi On Congress: 'काँग्रेस अस्थिरता, घराणेशाही आणि तुष्टीकरणाची जननी आहे, पक्ष आजही षड्यंत्र रचत आहे'; भाजपच्या अधिवेशनात पंतप्रधान मोदींची जहरी टीका)
My thoughts and prayers are with the countless devotees of Acharya Shri 108 Vidhyasagar Ji Maharaj Ji. He will be remembered by the coming generations for his invaluable contributions to society, especially his efforts towards spiritual awakening among people, his work towards… pic.twitter.com/jiMMYhxE9r
— Narendra Modi (@narendramodi) February 18, 2024
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी आचार्य विद्यासागर यांना वाहिली श्रद्धांजली -
विश्व पूज्य आणि राष्ट्रसंत आचार्य श्री विद्यासागर महामुनिराज जी डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे समाधी घेत असल्याची बातमी मिळाली. आपल्या गतिमान ज्ञानाने छत्तीसगडसह देश आणि जगाला समृद्ध करणारे आचार्य श्री विद्यासागर जी महाराज देश आणि समाजासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, त्याग आणि तपश्चर्यासाठी युगानुयुगे स्मरणात राहतील. मी तुमच्या चरणी प्रणाम करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. (वाचा - Anjana Bhowmick Passed Away: ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री अंजना भौमिक यांचे निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप)
तथापी, दिल्ली येथे आयोजित भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, पक्षाने पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक मिनिट मौन पाळून जैन संत आचार्य श्री यांना श्रद्धांजली वाहिली.