Anjana Bhowmick Passed Away: ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री अंजना भौमिक यांचे निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Anjana Bhowmick (PC - X/@UpendrraRai)

Anjana Bhowmick Passed Away: चित्रपट सृष्टीतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री अंजना भौमिक (Anjana Bhowmick) यांचे निधन झाले. अभिनेत्रीला श्वसनाचा त्रास होत होता. आजारी पडल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शुक्रवारी रात्री दक्षिण कोलकाता येथील रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सकाळी 79 वर्षीय अंजनाने जगाचा निरोप घेतला. अंजना ही अभिनेता जिशू सेनगुप्ताची सासू होती.

प्राप्त माहितीनुसार, अंजना भौमिक यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी नीलांजना आणि जावई जिशू हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. रिपोर्ट्सनुसार, अंजना भौमिक दीर्घकाळापासून आजारी होत्या आणि त्यांना आरोग्याशी संबंधित आरोग्य समस्या होत्या. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून अंजना अंथरुणाला खिळलेली होती. अभिनेत्रीची मुलगी नीलांजना आणि चंदना तिची काळजी घेत होती. अंजनाच्या निधनाची बातमी कळताच दिग्दर्शक सृजित मुखर्जी, अरिंदम सिल आणि बंगाली सिनेसृष्टीतील इतर स्टार्सही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. (हेही वाचा - Suhani Bhatnagar Passed Away: दंगल फेम अभिनेत्री 'सुहानी भटनागर' हीच निधन, वयाच्या 19 वर्षी घेतला शेवटचा श्वास)

अंजना भौमिक यांचा जन्म डिसेंबर 1944 मध्ये झाला. अनिल शर्मा नावाच्या नौदल अधिकाऱ्याशी तिचा विवाह झाला होता. त्यांना नीलांजना आणि चंदना या दोन मुली आहेत. नीलांजना टीव्ही शो 'हिप हिप हुर्रे'मध्ये दिसली होती. मात्र, आता ती अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. तसेच पती जिशू सेनगुप्तासोबत कोलकात्यात राहत आहे. (हेही वाचा - Kavita Chaudhary Passed Away: मोठी बातमी! टीव्ही अभिनेत्री आणि निर्माती कविता चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन)

अंजना भौमिक यांची चित्रपट कारकीर्द -

अंजना भौमिकने वयाच्या 20 व्या वर्षी 1964 मध्ये आलेल्या 'अनुस्तुप चंदा' या बंगाली चित्रपटातून पदार्पण केले. दिवंगत अभिनेते उत्तम कुमारसोबतच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीसाठी ती ओळखली जात होती. या दोघांनी 'ठाना थेके अस्ची', 'चौरंगी', 'नायका संवाद', 'कभी मेघ' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 'महेश्वेता' (1967) या चित्रपटात सौमित्र चॅटर्जीसोबत अंजनाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. अंजनाने अनेक वर्षांपूर्वी इंडस्ट्रीला अलविदा केला होता.