Ghaziabad Shocker: गाझियाबाद (Ghaziabad) च्या मसुरी पोलीस स्टेशन परिसरात रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) रील्स (Reels) बनवत असताना एक महिला आणि दोन पुरुषांना ट्रेनने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांना याबाबतची माहिती रेल्वे स्टेशन मास्टरकडून मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तिघांचीही ओळख पटली आहे.
डीसीपी ग्रामीण डॉ. इराज राजा यांनी सांगितले की, पोलिसांना स्टेशन मास्टरच्या मेमोद्वारे घटनेची माहिती मिळाली. बुधवारी रात्री हे तिघेही व्हिडिओ बनवत असताना मसुरीतील कल्लू गढी रेल्वे क्रॉसिंगजवळ गाझियाबादहून लखनऊला जाणाऱ्या पद्मावत एक्स्प्रेस ट्रेनला धडकले. पद्मावत एक्स्प्रेसच्या लोको पायलटने रेल्वे स्थानकावरील पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. (हेही वाचा - धक्कादायक! मुंबईत दीड वर्षात 1 हजार 962 प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू; रेल्वे पोलिसांनी दिली माहिती)
शकील (वय, 32), नदीम (वय, 23) आणि जैनब (वय, 20) अशी मृतांची नावे आहेत. शकील आणि नदीम हे दोघे मित्र होते. ते दोघे ट्रक चालक होते. नदीमने जैनबसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तिघेही बुधवारी दुपारी दोन वाजता सामान आणण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. (हेही वाचा - Viral Video: रेल्वे ट्रॅक पार करताना रेल्वे आली आणि क्षणांत होत्याचं नव्हतं झालं, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ)
दरम्यान, मसुरीतील कल्लू गढी रेल्वे क्रॉसिंगजवळ गाझियाबादहून लखनऊला जाणाऱ्या पद्मावत एक्स्प्रेसने या तिघांना धडक दिली. यावेळी हे तीघेही रील्स बनवत. रेल्वे ट्रकवर रील्स बनवताना रेल्वेने धडक देण्याची ही पहिलीचं घटना नाही. यापूर्वी अनेकदा रेल्वे ट्रॅकवर रील्स बनवणं तरुणांना महागात पडलं असून कित्येकांचा जीव देखील गेला आहे.