Infosys चे सह-संस्थापक नारायण मूर्ति यांचा जावई ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या अर्थमंत्री पदी नियुक्ती
Rishi Sunak (Photo: Twitter)

ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांनी भारतीय वंशाचे राजकिय नेता ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची गुरुवारी अर्थमंत्री पदी नियुक्ती केली आहे. ऋषी सुनक हे इन्फोसिस (Infosys) कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे (Narayana Murthy) जावई आहेत. जॉनसन यांच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाचे दुसरे मोठे मंत्री आहेत. तसेच प्रीति पटेल या सुद्धा भारतीय वंशाच्या असून त्या ब्रिटेनच्या गृहमंत्री पदाचा कारभार सांभाळत आहेत. यापूर्वी पाकिस्तानी वंशाचे साजिद जाविद यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा कारभार होता. परंतु त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांनी नुकताच पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणूकीत जॉनसन यांच्या नेतृत्वाखालील कंजरव्हेटिव्ह पार्टीने बहुसंख्य मतांनी विजय मिळवत पुन्हा सत्ता प्रस्थापित केली. पंतप्रधान जॉनसन यांनी यावेळी त्यांच्या मंत्रीमंडळात मोठा फेरबदल केला आहे.

सुनक हे आतापर्यंत जाविद यांच्या कनिष्ठ स्तरावर अर्थमंत्रालयात कार्यरत होते. ब्रिटेनच्या प्रंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या विधानात असे म्हटले आहे की, महाराणी (एलिजाबेथ) ऋषी सुनक यांना नवे अर्थमंत्री पद जाहिर करण्याबबात फार उत्साहित आहेत. सुनक यांनी ऑक्सफॉर्ड युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधून राजकिय अर्थशास्र आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुनक पहिल्यांदा 2015 मध्ये खासदार बनल्यानंतर त्यांनी कंजरवेटिव्ह पार्टीत आपली प्रगती केली.(अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी ला भारत दौऱ्यावर; White House ची माहिती)

ऋषी सुनक यांच्याबाबत बोलायचे झाल्यास पाच वर्षांपूर्वी ते खासदार सुद्धा नव्हते. राजकरणात प्रवेश करण्यापूर्वी ते गोल्डमॅन सॅश मध्ये बँकरच्या रुपात काम करत होते. बोरिस जॉनसन यांना त्यांच्या मंत्रीमंडळात असे अर्थमंत्री हवी होते जे जगातील सर्वात मोठी पाचव्या अर्थव्यवस्थेसाठी सुधारणा करु शकतात.