Lockdown in India: लॉकडाऊनचा नवा फॉर्म्युला भारतासाठी उपयुक्त ठरेल का? WHO ने दिला ग्रीन सिग्नल, जाणून घ्या तज्ञांचे मत
Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

Lockdown in India: जगभरात ओमिक्रॉनच्या वाढत्या उद्रेकामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची मागणी जोर धरू लागली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी जगातील अनेक देशांनी आपापल्या देशात लॉकडाऊन (Lockdown in India) लागू केले आहे. तिसरी लाट भारतात आली आहे. अशा परिस्थितीत भारतात लॉकडाऊनची गरज भासणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या भारतातील सात राज्ये कोरोनाने त्रस्त आहेत. त्यामुळे भारतात लॉकडाऊनची चर्चा सुरू आहे. लॉकडाऊन म्हटलं की, देशातील जनता घाबरते. कारण लॉकडाऊनच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी देश उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना पाहिला आहे. भारतात लॉकडाऊनची गरज आहे की, नाही हे जाणून घेऊया. यावर जागतिक आरोग्य संघटनेने भारतासाठी काही सूचनाही दिल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, भारतात कोरोना विषाणूची तिसरी लाट असूनही संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची गरज नाही. भारतासारख्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन आणि प्रवासावरील निर्बंध यांसारख्या पावलांमुळे नुकसान होऊ शकते, असे संघटनेने म्हटले आहे. संघटनेने लॉकडाऊनचा नवा फॉर्म्युला दिला आहे. तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी भारताने जोखमीनुसार निर्बंध लादण्याची रणनीती आखली पाहिजे, असे संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दुसऱ्या लाटेपासून धडा घेत जीव आणि रोजगार दोन्ही वाचवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले आहे. संस्थेने म्हटले आहे की, भारत आणि जगभरातील सार्वजनिक आरोग्य कृती ठरवण्यासाठी चार प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. हा प्रकार किती संसर्गजन्य आहे हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे संस्थेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, भारतात संपूर्ण लॉकडाऊन सारख्या उपायांचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत. (वाचा - COVID 19 Cases in India: भारतात कोरोना रूग्णांमध्ये वाढ; मागील 24 तासांत 2,82,970 नवे रूग्ण; 441 मृत्यू)

WHO ने सांगितले की, प्रवास पूर्णपणे प्रतिबंधित करणे किंवा लोकांची ये-जा थांबवणे असे सुचवत नाही. असे निर्बंध जास्त नुकसान करतात. अशा परिस्थितीत भारताच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होईल. भारतासारख्या देशात जिथे लोकसंख्येच्या वितरणात खूप विविधता आहे, तिथे साथीच्या रोगाशी लढण्यासाठी जोखीम-आधारित दृष्टिकोन अवलंबणे शहाणपणाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, सरकारने सध्याची परिस्थिती, आरोग्य क्षेत्राची क्षमता आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन महामारी थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. सर्व नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊन लागू करण्याची गरज भासणार नाही.

दरम्यान, भारतातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी मास्क आणि लस हे प्रभावी उपाय असल्याचे संस्थेने म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत, विद्यमान साधने आणि उपाय प्रभावी ठरत आहेत. लसीकरण वाढवणे, मास्क वापरणे, हाताची स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होते. या सर्वांचे पालन होत असेल तर लॉकडाऊनची गरज नाही.

भारतात कोरोनाची तिसरी लाट पाचपट वेगाने पसरत आहे. देशातील सात राज्यांमध्ये संसर्गाची स्फोटक स्थिती आहे. ओमिक्रॉनच्या झपाट्याने पसरत चाललेल्या प्रसारामुळे देशात लॉकडाऊन होणार का ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. देशातील आधीच्या दोन लॉकडाऊनवर नजर टाकली तर देशात कोरोनाची परिस्थिती पूर्वीपेक्षा भयावह बनत चालली आहे.