एक रूपयाचं नाणं बनवण्यासाठी किती खर्च येतो? हे तुम्हांला ठाऊक आहे का? त्याच्या मूल्यापेक्षा निर्मितीचा खर्च अधिक आहे का? असा प्रश्न सध्या ट्रेंड होत आहे. भारतामध्ये एक रूपयाच्या शिक्क्याची निर्मिती मूल्य सुमारे 1.11 आहे. जो त्याच्या मूल्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे जाणून घ्या नेमकं एक रूपयाचं नाणं बनतं कसं?
भारतीय मुद्रा च्या अंतर्गत एक रूपयाचं नाणं स्टेनलेस स्टील चं बनलेल असतं. या नाण्याचा व्यास 21.93 मिलीमीटर, जाडी 1.45 मिलीमीटर आणि वजन 3.76 ग्राम आहे. हे नाणं 1992 पासून चलनात आहे आणि त्याला भारत सरकार कडून जारी केलं जातं.
एक रूपयाचं नाणं हे केवळ एक रूपयाचं मूल्य ठेवतं. अनेकांना त्याच्या मूल्यापेक्षा अधिक पैसे त्याच्या निर्माण प्रक्रियेत लागत असल्याने अनेक प्रश्न पडले आहेत. 1 रूपयाच्या मूल्यापेक्षा त्याच्या निर्मितीला अधिक पैसे लागण्यामागे कच्चा माल, श्रम आणि अन्य घटकांचा समावेश आहे.
या संदर्भात, गुगलने (Google)"Googlies on Google" ही जाहिरात मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये युजर्सना सामान्य ज्ञान प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. या मोहिमेचा हॅशटॅग #DhoondogeTohJaanoge आहे. जेव्हा तुम्ही "एक रुपयाच्या नाण्याचा उत्पादन खर्च" सारख्या प्रश्नाची उत्तरं शोधता, तेव्हा तुम्हाला एक मेसेज मिळेल: "अभिनंदन! तुम्ही तुमचे पहिले Google अनलॉक केले आहे!" हे केवळ माहितीपूर्ण नाही तर ज्ञान वाढवण्याचा एक मजेदार मार्ग देखील आहे.
एक रुपयाचे नाणे हे केवळ चलन नाही, तर ते भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि तिच्या उत्पादन प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याची उत्पादन किंमत त्याच्या मूल्यापेक्षा जास्त आहे हे दर्शविते की चलन निर्मिती ही एक जटिल प्रक्रिया आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही एक रुपयाचे नाणे पाहाल तेव्हा त्याची निर्मिती खर्च आणि त्यामागील कथा लक्षात ठेवा.