Union Public Service Commission अर्थात यूपीएसई कडून Specialist posts साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना या नोकरभरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांना UPSC ची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे. 87 जागांवर नोकरभरती होणार असून त्यासाठी अर्ज केले जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी आहे. अर्ज प्रिंट स्वरूपात सादर करण्याची अंतिम मुदत 12 जानेवारी आहे. 87 पैकी 46 जागा या Specialist Grade III (Anaesthesiology),एक जागा Specialist Grade III (Biochemistry),7 जागा Specialist Grade III (Forensic Medicine),आणि 9 जागा Specialist Grade III (Microbiology)साठी आहेत.
सात अन्य जागा या Specialist Grade III (Pathology) आणि 8 जागा Specialist Grade III (Plastic Surgery & Reconstructive Surgery)साठी आहेत. दरम्यान वरील पदांवर नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तपासून पहावी लागणार आहे. त्यासाठी नोटिफिकेशन सविस्तर पहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
UPSC Recruitment 2023 साठी अर्ज करणार्यांना 25 रूपये शुल्क भरावे लागणार आहे. महिला आणि SC, ST,दिव्यांग यांना हे परीक्षा शुल्क माफ असणार आहे. हे देखील नक्की वाचा: UPSC Exam Calendar 2024: यूपीएससी कडून CSE Prelims, NDA, CDS Exams ते ESE Prelims 2024 कधी? upsc.gov.in वर पहा वेळापत्रक .
परीक्षेचं शुल्क हे एसबीआय बॅंकेमध्ये कॅश किंवा नेट बॅंकिंग द्वारा भरले जाऊ शकतं. सोबतच त्यांना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, यूपिआय यांच्याद्वारा देखील फी भरण्याची मुभा असणार आहे.