Union Public Service Commission अर्थात यूपीएससी कडून 11 मे दिवशी 2024 वर्षामधील परीक्षांचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये Civil Services Prelims Examination 2024 आणि and Indian Forest Service Preliminary Examination 2024 या 26 मे 2024 दिवशी होणार आहेत. सध्याचं तात्पुरतं वेळापत्रक आयोगाने upsc.gov.in या त्यांच्याscअधिकृत वेबसाईट वर जारी केलेले आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा वेळ 2 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यानचा आहे. नक्की वाचा: UPSC Mobile App: लोकसेवा आयोगाकडून मोबाइल अॅप लॉंच; परिक्षा, पदभरती संदर्भात मिळणार एका क्लीकवर अपडेट .
इथे पहा वेळापत्रक कसं कराल डाऊनलोड?
- अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट दया.
- होम पेजवर UPSC Annual Calendar 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमच्या स्क्रिनवर पीडीएफ स्वरूपातील UPSC Exams 2024 schedule दिसेल.
- युपीएससी च्या या तारखांमध्ये तुम्हांला कोणत्या परीक्षांना सामोरं जायचं आहे ते ठरवा.
- यूपीएससीचं हे वेळापत्रक तुम्ही डाऊनलोड देखील करून ठेवू शकता.
UPSC NDA & NA Iआणि CDS I Exams 2024 ही 21 एप्रिलला होणार आहे. त्यासाठीचे अर्ज डिसेंबर 20, 2023 ते 9 जानेवारी 2024 दरम्यान स्वीकारले जाणार आहेत. UPSC NDA & NA II and CDS II Exams 2024 परीक्षा सप्टेंबर 9, 2024दिवशी आहे त्याची अर्ज प्रक्रिया 15 मे ते 4 जून 2024 दरम्यान चालणार आहे. UPSC Engineering Services (Main) Exam 2024 ही 23 जून दिवशी होणार आहे.