Aadhaar Card Rule Changed: आधार (Aadhaar Card) संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आधार नियमांमध्ये (Aadhaar Card Rules) सरकारने मोठा बदल केला आहे. फिंगरप्रिंट्स (Fingerprints) उपलब्ध नसल्यास 'आधार'साठी पात्र असलेली व्यक्ती 'आयरिस' स्कॅन (Iris Scan) वापरून नावनोंदणी करू शकते, असे सरकारने म्हटले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केरळ (Kerala) मधील जोसीमोल पी जोस या महिलेच्या नामांकनाची पुष्टी केल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
हाताची बोटे नसल्याने आधार नोंदणीत अडथळा -
हाताची बोटे नसल्यामुळे महिलेला आधार नोंदणी करता आली नाही. आधारच्या नियमातील या बदलाचा लाखो लोकांना फायदा होणार आहे. अनेक लोकांकडे आधार नोंदणीसाठी बोटांचे ठसे नसल्यामुळे आधार नोंदणी करणे शक्य झाले नाही. नवीन बदलामुळे आता फिंगरप्रिंटची गरज नसणार आहे. (हेही वाचा - Aadhaar Card शी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी विसरलात? या सोप्या स्टेप्सने करा Verify)
पर्यायी बायोमेट्रिक्स घेऊन आधार नोंदणी करता येणार -
निवेदनानुसार, भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) च्या टीमने केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कुमारकम येथील रहिवासी असलेल्या जोसची त्यांच्या घरी भेट घेतली आणि त्याचा आधार क्रमांक तयार केला. यानंतर सर्व आधार सेवा केंद्रांना अस्पष्ट बोटांचे ठसे किंवा इतर तत्सम दिव्यांग व्यक्तींना पर्यायी बायोमेट्रिक्स घेऊन आधार जारी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. या नवीन बदलानुसार, जो व्यक्ती आधारसाठी पात्र आहे परंतु फिंगरप्रिंट प्रदान करण्यात अक्षम आहे ती व्यक्ती केवळ बुबुळ स्कॅन वापरून नोंदणी करू शकते. (हेही वाचा - Aadhaar Card अपडेट करण्यासाठी 'ही' कागदपत्रं आवश्यक; पहा संपूर्ण यादी)
याशिवाय ज्या पात्र व्यक्तीचे बुबुळ कोणत्याही कारणास्तव कॅप्चर केले जाऊ शकत नसेल तर, त्याच्या फिंगरप्रिंटचा वापर करून आधार नोंदणी केली जाऊ शकते. बोट आणि बुबुळ दोन्ही बायोमेट्रिक्स प्रदान करू शकत नसलेल्या व्यक्तीची नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख या आधारे नोंदणी केली जाऊ शकते.