Aadhaar, EPFO (Photo Credits: Facebook)

प्रोविडंड फंड मधील पैसे सहज काढता यावेत म्हणून आता ईपीएफओ ने त्यांच्या सदस्यांना UAN सोबत आधार कार्ड नंबर जोडण्याचं आवाहन केले आहे. आधार (Aadhaar Number) आणि ईपीएफओ (EPFO) यांचं लिकींग केल्याने आता फंड्स काढणं, ते ट्रान्सफर करणं हे सोयीचं होणार आहे. अद्याप तुम्ही युएएन (UAN) आणि आधार नंबर लिंक केला नसेल तर तुम्हांला आता तो उमंग अ‍ॅपच्या माध्यमातूनही करणं शक्य आहे. युनिफाईड मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आता तुम्हांला राज्य आणि केंद्र सरकारच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान तुम्ही ईपीएफओ ची वेबसाईट www.epfindia.gov.in वर देखील आधार नंबर लिंक करण्याची सोय आहे. ( नक्की वाचा: नोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं?).

उमंग अ‍ॅप वरून Aadhaar आणि UAN यांना लिंक कसे कराल?

  • UMANG application तुमच्या स्मार्टफोन वर डाऊनलोड करा.
  • अ‍ॅप वर तुम्हांला अनेक सर्व्हिसेस पाहता येतील त्यापैकी EPFO link वर क्लिक करा.
  • "eKYC Services" वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हांला "Aadhaar seeding"चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. आता UAN number नंबर टाका. नंतर तुम्हांला ओटीपी येईल. मग आधार नंबर, लिंग अशी माहिती विचारली जाईल ती अपडेट करा.
  • ओटीपी एंटर करून माहिती व्हेरिफाय करा. आता तुमच्या UAN number नंबर सोबत आधार नंबर जोडला जाईल.

दरम्यान ईपीएफओच्या वेबसाईट वर देखील त्यांनी पीएफ अकाऊंटला आधार नंबर सोबत जोडण्यासाठी खास सोय उपलब्ध करून दिली आहे.

ईपीएफओ च्या वेबसाईट वरून तुम्ही UAN number नंबर सोबत आधार नंबर कसा जोडाल?

  • ईपीएफओ ची वेबसाईट www.epfindia.gov.in ला भेट द्या.
  • होमपेजवर तुम्हांला ऑनलाईन सर्व्हिसेस हा पर्याय दिसेल.
  • त्यामध्ये "eKYC Portal" वर क्लिक करा.
  • "Link UAN Aadhaar" वर क्लिक करा.
  • यानंतर युएएन रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो तुम्हांला व्हेरिफाय करावा लागेल. त्यानंतर आधार नंबर देऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.

ऑनलाईन प्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही आधार लिंक करू शकता यासाठी तुम्हांला पीएफ च्या ऑफिसमध्ये जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. यावेळेस तुम्हांला युएएन नंबर सोबत आधार कार्ड, पॅन कार्डच्या सेल्फ अटेस्टेड कॉपीज द्याव्या लागतील. त्याच व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं आधार पीएफ अकाऊंट सोबत लिंक होईल.