नोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं?
वयाच्या 58 व्या वर्षापूर्वी तुम्ही निवृत्त होत असाल किंवा नोकरी बदलत असाल तर विशेष दक्ष राहणं गरजेचे आहे अन्यथा काही आर्थिक नुकसान होऊ शकतात.
नोकरदार व्यक्तींसाठी पीएफ अकाऊंट्स(PF Account) ही अत्यंत जवळची गोष्ट असते. पीएफ हा प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी रिटायरमेंट फंड असतो त्याच्यामध्ये निवृत्तीनंतर आर्थिक पुंजीची ठेव असते. आता नोकरदार व्यक्तींसाठी पीएफ अकाऊंटसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. तुमच्या पीएफ अकाऊंट्सचा पूर्णपणे फायदा मिळवता यावा यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळणं गरजेचे आहे. वयाच्या 58 व्या वर्षापूर्वी तुम्ही निवृत्त होत असाल किंवा नोकरी बदलत असाल तर विशेष दक्ष राहणं गरजेचे आहे अन्यथा काही आर्थिक नुकसान होऊ शकतात. नोकरी बदलताना अनेक नोकरदार एक चूक करतात ती म्हणजे नोकरी बदलताना अकाऊंट ट्रान्सफर न करणं. मग पहा तुम्ही 58 वर्षांपूर्वी निवृत्ती घेण्याचा किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पीएफ अकाऊंट सोबत काय होतं? PF Balance Check: तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत? एका मिस्ड कॉलवर मिळवा संपूर्ण माहिती.
नोकरी सोडल्यानंतर तुमच्या ईपीएफ अकाऊंट सोबत काय होतं?
- सध्याच्या नियमांनुसार, तुमची नोकरी सोडली आणि तुमच्या अकाऊंटमध्ये कोनतीही नवी कॉट्रिब्युशन होत नसतील तरीही त्यावर व्याज दिले जाते पण हे केवळ वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत असेल.
- तुमच्या पीएफ अकाऊंट मधील रक्कम वयाच्या 58व्या वर्षापर्यंत किंवा नोकरी सोडत नाही तो पर्यंतच टॅक्स फ्री असते.
- इन्कम टॅक्सच्या नियमावलीनुसार, तुमच्या पीएफ अकाऊंट मधील रक्कम जर तुम्ही सलग 5 वर्ष कामाच्या आधीच काढली तर तुम्हांला त्यावर टॅक्स द्यावा लागू शकतो.
- पहिल्या 5 वर्षांमध्ये एखाद्याने विविध कंपन्यांसोबत काम केले असेल आणि पीएफ अकाऊंट पुढील कंपनीसाठी ट्रान्सफर केले असेल तर तो नोकरीचा काळ हा 'सलग' मानला जातो.
कोणत्या गोष्टींचं भान ठेवणं अत्यावश्यक?
- तुमच्या पीएफ अकाऊंट्सचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर तुम्हांला नोकरी बदलल्यानंतर ती अकाऊंट्स शक्य तितक्या लवकर ट्रांसफर करणं आवश्यक आहे.
- अनेक अकाऊंट्स असतील तर ती सारख्याच UAN नंबर सोबत जोडलेली असणं आवश्यक आहे.
- तुम्ही 58 वयाच्या पूर्वी निवृत्त होणार असाल तर तुम्हांला निवृत्तीच्या 36 महिन्यांतच अकाऊंटमधील पैसे काढणं आवश्यक आहे.
PF अकाऊंट्स इनअॅक्टिव्ह कधी होऊ शकतात?
- 55 वर्षांच्या नोकरीनंतर 3 वर्षांत नोकरदार व्यक्तीने त्यांचे पैसे पीएफ अकाऊंट मधून न काढल्यास
- ईपीएफ अकाऊंट होल्डर दुसर्या देशात कायमचा स्थलांतरित झाल्यास
- पीएफ अकाऊंट होल्डरचं निधन झाल्यास
- नोकरी सोडल्यानंतर 36 महिन्यात संबंधित व्यक्तीने अकाऊंट सेटलमेंट्स साठी अर्ज न केल्यास किंवा पैसे काढण्यासाठी अर्ज न केल्यास अकाऊंट टर्मिनेट केलं जाऊ शकतं.
PF चा व्याजदर आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.50 टक्क्यांवर कायम आहे. मागील वर्षभर कोरोना संकटामुळे अर्थ व्यवस्था गडगडल्याने आणि नोकर्यांवरही त्याचा परिणाम झाल्याने या वर्षी व्याजदर कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र व्याजदर कायम ठेवण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2021 10:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

