SBI Festive Offers: हिंदू पंचांगानुसार श्रावण आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार ऑगस्ट महिना सुरु झाला की सण, उत्सवांचे दिवस सुरु होतात. या महिन्यांनतरचे पुढचे काही महिने सण आणि उत्सवांची रेलचेल असते. या सण आणि उत्साहाचे औचित्य साधून भारतातील सर्वात मोठी बँक State Bank Of India (एसबीआय) आपल्या ग्राहकांसाठी खास योजना घेऊन आली आहे. ज्यात स्वस्त वाहन कर्ज, स्वस्त व्याजदरात इतर कर्ज अशा अनेक ऑफर्स आहेत. यात कर्ज प्रक्रिया शुल्क (Loan Processing Fee) सुद्धा कमी करण्यात येणार आहे. दरम्यान, बँकेने या ऑफर्सच्या वैधतेबाबत मात्र अद्याप माहिती दिली नाही. देशभरात 10 लाख योनो (YONO) कॅश पॉइंट सुरु करणार असल्याचेही एसबीआयने म्हटले आहे.
एसबीआय (SBI) बँकेने सणांच्या काळात (Festive Season) वाहन कर्जावर (Car Loan) आकारण्यात येणारे कर्ज प्रक्रिया शुल्क हटवले आहे. अनेक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. बँकेची वेबसाईट-डिजिटल मंच योनो (YONO) च्या माध्यमातून कर्जासाठी मागणी करणाऱ्या ग्राहकांना व्याज दरात 0.25 टक्क्यांची अतिरिक्त सवलतही दिली जाणार आहे. पगारदार ग्राहक (Salaried Customers) ऑन रोड कार किमतीच्या (On Road Price) 90 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. दरम्यान, एसबीआयच्या एमसीएलआर (MCLR) मध्ये 0.58 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे एप्रिल 2019 पर्यंत बँकेच्या सर्व कर्जांच्या व्याजदरात सुमारे 0.35 टक्क्यांची कपात झाली आहे.
एसबीआयने रेपो दर दर (Repo Rate) आधारीत कर्जाच्या स्वरुपात 8.05 टक्क्यांच्या व्याज दरात गृह कर्ज देऊ केले आहे. हे दर एक डिसेंबर पासून पुढे आणि नव्या गर्जदारांना लागू असतील. बँकेने ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंत व्यक्तिगत कर्ज (Personal Loan) 10.75 टक्क्यांनी देणार असल्याचे म्हटले आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी 6 वर्षांचा असेन. ज्यामुळे ग्राहकांवर मासिक हप्ता (EMI) भरताना कमी बोजा पडेल. (हेही वाचा, घरबसल्या तब्बल 7 कोटी रुपये कमावण्याची सूवर्णसंधी; Apple कंपनीची नवी ऑफर)
एसबीआय देशभरात 10 लाख योनो (YONO) कॅश पॉइंट सुरु करणार आहे. एसबीआय हे कॅश पॉइंट्स येत्या 18 महिन्यात सुरु करणार आहे. एसबीआय योनो कॅश पॉइंटच्या माध्यमातून देशात डिजिटल प्लॅटफॉर्मला गती देईल. तसेच, प्लास्टिक डेबिट कार्डचा वापर करमी करण्याचाही बँकेचा मानस आहे. एसबीआय ग्राहक योनो कॅश पॉइंटच्या माध्यमातून विना डेबिट कार्ड एटीएममधून पैसे काढू शकतील.