घरबसल्या तब्बल 7 कोटी रुपये कमावण्याची सूवर्णसंधी; Apple कंपनीची नवी ऑफर
Opportunity to get rich | Image only representative purpose (Photo Credits: PixaBay)

Apple Will Give Rs 7 Crore: तुम्ही तंत्रज्ञानातले जाणकार आहात. तुम्ही नोकरीच्या शोधात आहात. तुम्हाला घरबसल्या पैसे कमविण्याच्या आयडीयाच्या कल्पना शोधत असाल अथवा तुमच्या दैनंदिन कमाईपेक्षाही अधिक कमाई करण्याचा विचार तुमच्या डोक्यात सातत्याने घोळत असेल. तर, तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. ही संधीही साधीसुधी नव्हे बरं! तर, एका दणक्यात तब्बल 7 कोटी रुपये कमाविण्याची ही संधी आहे. मोबाईल तसेच, इतर गॅझेट्स विश्वातील अग्रगण्य असलेल्या Apple (अॅपल) कंपनीने एक नवीच नवी ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरनुसार विजेत्याला मिळणार आहेत तब्बल 7 कोटी रुपये. काय आहे ही ऑफर? घ्या जाणून

मोबाईल विश्वातील अग्रगण्य Apple कंपनीने सध्या बग बाउंटी उपक्रम (प्रोग्राम) हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत इंडिपेंडेंट रिसर्चर्स ला अॅपलच्या iOS मध्ये काही तांत्रिक त्रूटी शोधायच्या आहेत. या त्रूटी अॅपलच्या निदर्शनास आणून दिल्यास संबंधित व्यक्तीस 7 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. या प्रोग्रामअंतर्गत आतापर्यंत अनेक धोकादायक बग्जची माहिती मिळाली आहे. कंपनीने आता या प्रोग्रामचा विस्तार करायचे ठरवले असून ही मोहीम Apple च्या इतर प्रॉडक्ट्ससाठीही सुरु करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. या मोहिमेसाठी कंपनी अधिक पैसा खर्च करणार आहे.

अॅपलने सुरु केलेल्या या मोहिमेची धास्ती हॅकर्सनी मोठ्या प्रमाणावर घेतली आहे. कारण, अॅपलची ही मोहीम केवळ iOS सिस्टमला कव्हर करतो. पैशाच्या लालसेपोठी रिसर्चर्स दूसऱ्या अॅपल प्लॅटफॉर्मची शोधलेली तांत्रिक माहिती आणि त्रूटी डार्क वेब पेजवर विकू शकतात. उत्पादनाच्या सुरक्षेसाठी ते धोकादायक ठरते. त्यामुळे तांत्रिक त्रूटी शोधून देणाऱ्या व्यक्तीस भरघोस रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे. (हेही वाचा, ऑनलाईन व्यवहार करणे झाले सोपे; OTP ची कटकट, पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही, जाणून घ्या प्रक्रिया)

लास वेगास येथे आयोजित ब्लॅक हॅट सिक्यॉरिटी कॉन्फरन्समध्ये अॅपलने सिक्यॉरिटी इंजिनियरिंगच्या प्रमुखांनी घोषणा केली की, हा बग बाउंटी प्रोग्रामचा विस्तार केला जाईल. या प्रमुखांनी सांगितले की, iOS प्रोग्रामसोबत आता कंपनी नवा बग बाउंटी प्रोग्राम चालवेल. ज्यामुळे रिसर्चर्सला आता macOS, tvOS, watchOS आणि iCloud मध्ये तांत्रिक त्रूटी शोधण्याची संधी मिळाली. ज्याचे बक्षीस म्हणून त्यांना रोख रक्कम दिली जाईल.

दरम्यान, प्रोग्रामच्या विस्तारासोबतच अॅपलने मॅक्झिमम कॅश पे आउट म्हणजेच बक्षीस रक्कम वाढवलीही जाणार आहे. जी बग शोधण्यावर सिक्यॉरिटी रिसर्चर्सला दिली जाईल. कंपनीने ही रक्कम 200,000 डॉलर वरुन वाढवत 1 मिलियन डॉलर इतकी केली आहे. त्यामुळे आपणही आता कोट्यवधीची बक्षीस रक्कम जिंकू शकता.