
देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयचे (SBI) नाव घेतले जाते. तसेच एसबीआयकडून आपल्या ग्राहकांना नेहमीच उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. तर आता एसबीआयने डिजिटल पद्धतीमधील एटीएम कार्ड संबंधित एक अॅप आणले असून त्यामधून तुम्ही एटीएम कार्ड कधीही बंद-सुरु करु शकणार आहात. तसेच हे नवे एटीएम कार्ट तुमच्या कंट्रोल प्रमाणे कार्य करणार आहे.
बँकेकडून ही सुविधा एका अॅपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. एसबीआय क्विक असे या अॅपचे नाव असून त्यामध्ये कार्ड ब्लॉक, सुरु-बंद किंवा पिन कार्ड क्रमांक बदलणे या सुविधा असणार आहे. त्यामुळे तुमचे पैसे अधिक सुरक्षित राहणार आहेत.(SBI च्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात)