SBI बँक (File Photo)

एसबीआयने (SBI) 1 मे पासून आपल्या ग्राहकांच्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होणार आहे. तर एसबीआयने आपले व्याजदर रेपो रेट सोबत लिंक केल्याने बचत खात्यावरील व्याजदर कमी करण्यात आले आहेत.

बचत खाते असणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात 1 लाख पेक्षा जास्त रक्कम असणार आहे त्यांना 3.25 टक्के व्याजदर लागू करण्यात येणार आहे. तर 1 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या ग्राहकांना 3.50 टक्क्यांनी व्याजदर सुरु राहणार आहे. त्यामुळे एसबीआय या खात्यात सध्याच्या रेपो रेटनुसार 2.75 टक्क्यांनी कमी व्याज देणार आहे. सध्या रेपो रेट 6 टक्के असल्याने बचत खाते असणाऱ्या ग्राहकांना 3.25 टक्क्यांनी व्याज दिले जाणार आहे. परंतु रेपो रेट बदल्यास व्याज दरातसु्द्धा कपात केली जाणार आहे.(1 मे पासून सार्वजनिक सेवा क्षेत्रात मोठे बदल, जाणून घ्या 5 नवे नियम)

त्याचसोबत एसबीआयच्या अन्य खात्यांसाठी व्याजदर बदलण्यात आलेले नाहीत. तर 1 करोडपेक्षा जास्त रक्कम खात्यात असल्यास 4 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.