Sarkari Naukari (Photo Credits: File Image)

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून नुकत्याच Combined Higher Secondary (10+2) Level Examination च्या अंदाजे रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान 4,726 रिक्त जागांवर, 43 केंद्र सरकारच्या मंत्रलायामध्ये आता नोकरभरती होणार आहे. किमान 12 वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची ही संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी 15 डिसेंबरपूर्वी इच्छुक उमेदवारांना ssc.nic.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा लागणार आहे. मग नेमकी या नोकरभरतीमध्ये कोणत्या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे? त्यासाठी वयोमर्यादा काय असावी तसेच अर्ज प्रक्रियेमधील महत्त्वाच्या तारखा काय आहेत? हे सारे जाणून घेण्यासाठी खालील माहिती नक्की वाचा.

स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून दरवर्षी CHSL परीक्षा घेतली जाते. यामध्ये ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट,एलडीसी, पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट, डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी विविध विभागांमध्ये नोकरभरतीची प्रक्रिया पार पडते. SSC Calendar 2020-21: एसएससी परिक्षा कॅलेंडर जाहीर, इथे पाहा तारखा.

 SSC CHSL 2020 परीक्षा तारीख

SSC CHSL 2020 tier-1 ही कम्युटर बेस्ड परीक्षा एप्रिल 12 ते 27, 2021 दरम्यान घेतली जाणार आहे. Tier-II Examination जी लेखी परीक्षेच्या स्वरूपात द्यायची आहे त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

शैक्षणिक पात्रता निकष

SSC CHSL 2020 साठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी पास असणं आवश्यक आहे. LDC/ JSA, PA/ SA, DEO साठी हे लागू आहे. कॅगच्या ऑफिसमध्ये अर्ज करणार्‍यांसाठी 12 वी उत्तीर्ण असताना तो उमेदवार सायंस शाखेचा आणि गणित (Mathematics)विषयासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

SSC CHSL 2020 नोकरभरती दरम्यान अर्ज करणारी व्यक्ती ही 1 जानेवारी 2021 पर्यंत किमान 18 वर्ष पूर्ण आणि कमाल 27 वर्षांची असणं आवश्यक आहे. Maharashtra Job Vacancies 2020: लॉकडाऊन मध्ये जॉब गमावलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, सरकारकडून ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन, कशी कराल नोंदणी?

दरम्यान इच्छुक उमेदवारांना जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधील असाल तर 100 रूपये फी, महिला,SC, ST, PH, & Ex-Servicemen यांना निशुक्ल परीक्षा फी आकारली जाईल. हे शुल्क ऑफलाईन, ऑनलाईन मोडद्वारा केले जाऊ शकते.