SSC Calendar 2020-21: सरकारी नोकरी, सरकारी निर्णय आणि सरकारी घडामोडी यांवर बारीक नजर ठेवणाऱ्या मंडळींसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने सन 2020-21 साठी आपली दिनदर्शिका (SSC Exam Calendar 2020-21) प्रसिद्ध केली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC Staff Selection Commission) प्रतिवर्षी ही दिनदर्शिका (SSC Exam Calendar 2020-21) प्रसिद्ध करत असतो. या दिनदर्शिकेत एसएससी (Calendar ) घेत असलेल्या संयुक्त पदवी पतीळीवरील (CGL - Combined Graduate Level),एसएससी एमटीएस, संयुक्त उच्च स्तरावरील माध्यमिक (CHSL) यांसाह सुमारे 20 भर्ती परीक्षांची माहिती देण्यात आली आहे.
SSC Calendar 2020-21 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, एसएससी कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल परीक्षा (SSC CGL 2020) 2 मार्च ते 11 मार्च 2020 पर्यंत आयोजित केली जाईल. तर, संयुक्त उच्च पातळीवरील माध्यमिक (CHSL) परीक्षा 16 ते 27 मार्च 2020 या कालावधीत आयोजित केली जाईल. (हेही वाचा, Sarkari Naukri: 10 वी पास उमेदवारांसाठी BHEL येथे नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया)
एसएससीद्वारा जारी दिनदर्शिका 7 ते 13 डिसेंबर 2019 च्या रोजगार समाराचर मध्येही प्रकाशित करण्यात आले. अधिकृत दिनदर्शिकेनुसार एसएससीच्या विविध परीक्षा कोणत्या दिवशी होणार आहेत याबाबतची माहिती घेण्यासाठी इथे क्लिक करा.
याशिवाय एसएससी ज्युनिअर इंजिनिअरिंग परीक्षा (SSCjunior engineer) 30 मार्च ते 2 एप्रिल 2020 या कालावधीत आयोजित केली जाईल. एसएससी सीएपीएफ 2020 परीक्षा (SSC CAPF-2020) नोटिफिकेशन 17 एप्रिल 2020 रोजी जारी करण्यात येईल. तर, परीक्षा 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल.