जर तुम्ही उत्तम नोकरीच्या शोधात असल्यास तर BHEL या कंपनीत 10 वी पासआणि ITI सर्टिफिकेट प्राप्त केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये 305 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. तर ज्या उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास त्यांना कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन अधिक माहिती देण्यात येणार आहे. ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत फिटर, मेकॅनिक, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, ड्राफ्टमॅन, कारपेंटरसह अन्य पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असावे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणताही शुल्क स्विकारण्यात येणार नाही आहे.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी प्रथम कंपनीची अधिकृत वेबसाईट www.bhelhwr.co.in येथे अर्ज करता येणार आहे. त्यानंतर उमेदवाराला येथे लॉगिन आयडी तयार केल्यावर अधिकृत माहितीसह नोकरीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे दाखवावी द्यावी लागणार आहेत. तसेच या नोकरीसाठी ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही 10 वीच्या गुणांवर आधारित केली जाणार आहे. निवड केलेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला 7700 ते 8050 रुपयापर्यंत वेतन मिळणार आहे. BHEL नोकर भरती अर्ज प्रक्रिया PDF
तसेच उत्तर पश्चिम रेल्वे कडून Apprentice पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी दहावी, ITI पास झालेल्या उमेदवारांसाठी संधी आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचा आहे. हे अर्ज 8 डिसेंबर पूर्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभारात 2029 पदांसाठी ही संधी उपलब्ध आहे. ही नोकरीची संधी राजस्थानमध्ये आहे. जयपूर, बीकानेर, जोधपूर, अजमेर येथील वर्कशॉपमध्ये ही संधी मिळणार आहे