North Western Railway Apprentice Recruitment 2019: उत्तर पश्चिम रेल्वे कडून Apprentice पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी दहावी, ITI पास झालेल्या उमेदवारांसाठी संधी आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचा आहे. हे अर्ज 8 डिसेंबर पूर्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभारात 2029 पदांसाठी ही संधी उपलब्ध आहे. ही नोकरीची संधी राजस्थानमध्ये आहे. जयपूर, बीकानेर, जोधपूर, अजमेर येथील वर्कशॉपमध्ये ही संधी मिळणार आहे. इथे पहा उत्तर पश्चिम रेल्वे मधील संधीबाबतची संपूर्ण माहिती.
पात्रता निकष:
8 डिसेंबर 2019 पर्यंत वयाची किमान वर्ष 15 पूर्ण आणि कमाल 24 वर्ष असणं आवश्यक आहे.
SC, ST, OBC उमेदवारांना 5 वर्षांची मुदत आहे. Sarkari Naukri 2019: भारतीय नौदलात या पदांसाठी 400 जागांची भरती, joinindiannavy.gov.in नोकरीसाठी करता येईल अर्ज.
शुल्क :
जनरल आणि ओबीसी उमेदवारांना यासाठी 100 रूपये फी द्यावी लागणार आहे. तर जातीय आरक्षण असणार्यांना कोणतेही शुल्क आकरण्यात येणार नाही. याकरिता कार्ड पेमेंट, नेट बॅकिंगची सोय आहे.
अधिकृत वेबसाईट: rrcjaipur.in
8 नोव्हेंपासून यासाठी अर्ज मागवण्यात आले असून 8 डिसेंबर पर्यंत इच्छुका उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. दरम्यान या अप्रेटन्शीप्समध्ये वेतन काय असेल याची माहिती देण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी रेल्वेमध्ये खेळाडूंच्या भरतीसाठीदेखील अर्ज मागवण्यात आले आहेत.