(Photo credit: archived, edited, representative image)

Sarkari Naukri: केंद्रात लवकरच 7 लाख रिक्त पदांची भरती होणार असल्याची माहिती राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस केंद्रात एकून 6 लाख 83 हजार 823 रिक्त पदे आहेत. यातून 5 लाख 74 हजार 289 पद ग्रुप सी साठी रिक्त आहेत, तर 89 हजार 638 पदे बी ग्रुपसाठी आणि ग्रुप ए साठी 19 हजार 896 रिक्त पदे आहेत. बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढले असून या संख्येत घट करण्यासाठी सरकारकडून अधिक प्रयत्न केले जात आहेत.

2017-2018 च्या दरम्यान रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे भरती बोर्डाने दोन वर्षात होणाऱ्या रिक्त पदांची ग्रुप सी साठी 1 लाख 27 हजार 573 पदांची अधिसूचना जाहीर केली होती. जितेंद्र सिंह यांनी सागितले की, ग्रुप सी साठी केंद्रात 1 लाख 56 हजार रिक्त पदांची भरती होणार असल्याची अधिसूचना 2017-2018 मध्ये जारी केली होती. सध्या एसएससी आणि आरआरबीएस अंतर्गत 4 लाख 8 हजार 591 पदांवर भरती प्रक्रिया सुरु आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वर्गांसाठी आरक्षित पदांच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती राज्यमंत्र्यांनी दिली. हे देखील वाचा- Sarkari Naukri 2019: भारतीय नौदलात या पदांसाठी 400 जागांची भरती, joinindiannavy.gov.in नोकरीसाठी करता येईलअर्ज

सिंह म्हणाले, "वरील सहा व्यतिरिक्त अन्य तीन मंत्रालय व विभागांनी माहिती दिली आहे की, 31 डिसेंबर 2018 नुसार, अनुसूचित जातीच्या 9,624 रिक्त पदांपैकी 7,911 पदे, अनुसूचित जमातीच्या 8,659 रिक्त पदांपैकी 6,129 आणि इतर मागासवर्गीयांच्या 7,293 रिक्त पदांपैकी 5,520 पदे भरली आहेत. 1 जानेवारी 2019 पर्यंत अनुसूचित जातीची 1,713 पदे, अनुसूचित जमातीची 2,530 पदे आणि इतर मागासवर्गीयांची 1,773 पदे रिक्त होती